बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘पारू’मधून ब्रेक घेत अहिल्यादेवींची मुंबई सफर, मॉर्डन लूकमध्येही अभिनेत्री दिसते इतकी सुंदर, साताऱ्याहून परतल्यानंतरचा व्हिडीओ समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 10, 2024 | 11:48 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Mugdha Karnik At Mumbai

'पारू'मधून ब्रेक घेत अहिल्यादेवींची मुंबई सफर, मॉर्डन लूकमध्येही अभिनेत्री दिसते इतकी सुंदर, साताऱ्याहून परतल्यानंतरचा व्हिडीओ समोर

‘झी मराठी’ वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या ‘पारू’ या मालिकेने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. ‘पारू’ या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं आहे. सध्या ही मालिका तिच्या कथानकामुळे गाजत आहे. या मालिकेतील पात्रांवरही प्रेक्षक प्रेम करताना दिसत आहेत. मालिकेत सध्या पारूचा खडतर प्रवास आणि या प्रवासात आलेल्या संकटाना तोंड देत तिची लढाई पाहणं रंजक ठरत आहे. पारू या मालिकेत पारू ही भूमिका अभिनेत्री शरयू सोनावणे साकारत आहे. (Mugdha Karnik At Mumbai)

तर मालिकेत आदित्य ही भूमिका अभिनेता प्रसाद जवादे साकारत आहे. विशेषतः या मालिकेतील अहिल्यादेवी या पात्राने साऱ्यांची मनं जिंकली आहेत. अहिल्यादेवी या पात्राचं मालिकेत महत्त्वाचं स्थान असलेलं पाहायला मिळत आहे. सर्वाधिक वजनदार अशी भूमिका या मालिकेत अहिल्यादेवी किर्लोस्कर यांची आहे. अहिल्यादेवी किर्लोस्कर बोलतील तो शेवटचा शब्द असतो. त्यांच्या शब्दाबाहेर कोणतीच गोष्ट होत नसल्याने अहिल्यादेवी यांची मुख्य अशी भूमिका मालिकेत दाखविण्यात आली आहे.

आणखी वाचा – अरुंधतीने संजनाला सुनावलं, मैत्रिणींसमोर आप्पांची माफी मागायला लावली अन्..; दोघींमध्ये मोठा वाद

‘पारू’ या मालिकेत अहिल्यादेवी ही भूमिका अभिनेत्री मुग्धा कर्णिक साकारत आहे. करारी नजर, कठोर स्वभाव, एकचाली देहबोली ही अहिल्यादेवी यांच्या स्वभावाची वैशिष्ट्य आहेत, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मुग्धा कर्णिक हिने अहिल्यादेवी या पात्रातून प्रेक्षकांच्या मनात यशस्वी अशी छाप उमटवली आहे. मालिकेचं चित्रीकरण सध्या सातारा येथे सुरु आहे. त्यामुळे ही कलाकार मंडळी सातारा येथे राहत आहेत. चित्रीकरणाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत ही कलाकार मंडळी त्यांच्या घरी येत असतात.

आणखी वाचा – Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री महिन्याभरानंतर भारतात परतताच एअरपोर्टवर पोहोचल्या मैत्रिणी, तिथेच नाचल्या अन्…; व्हिडीओ व्हायरल

अशातच मालिकेतील अहिल्यादेवी म्हणजेच अभिनेत्री मुग्धा कर्णिक ही देखील वेळात वेळ काढत मुंबईत आली आहे. मुग्धा ही मुंबईची आहे. मुंबईत येऊन ती मुंबईनगरीत फिरताना दिसत आहे. शिवाय मुंबईत येऊन आमरसवरही अभिनेत्रीने ताव मारला आहे. शिवाय उशिरापर्यंत अभिनेत्री बाईक वरुन फिरत सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. जीवाची मुंबई असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे.

Tags: marathi serialmugdha karnikMugdha Karnik At Mumbaipaaru marathi serialzee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Paaru Serial Update

अहिल्यादेवींना मिळाली धमकी, पारूला पडलेलं स्वप्न होणार का सत्य?, मालिकेत येणार नवं वादळ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.