स्टार प्रवाह वाहिनी वरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’. आणि या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर. मालिकेतील अरुंधती या भूमिकेतून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मधुराणी सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. ती नेहमीच आपले फोटो व व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. अशातच आता तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तिला एक लोकप्रिय गाणं ओळखता आलं नाही. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्यावर टीका होत आहे. (Actress Madhurani Prabhulkar’s Video Viral On Social Media)
स्टार प्रवाह वरीलच आणखी एक लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे सिद्धार्थ जाधवचा ‘होऊ दे धिंगाणा’. ‘आई कुठे काय करते’ च्या टीमने नुकतीच या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या टीमबरोबरच ‘झिम्मा २’ या चित्रपटाचे कलाकारदेखील चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. यावेळी या कार्यक्रमातील ‘साडे माडे शिंतोडे’ हा गेम असतो. यात अरूंधतीला ‘देवाक काळजी रे’ या लोकप्रिय गाण्याच्या ओळी गाण्यासाठी देण्यात आल्या होत्या. मात्र तिला हे गाणंच ठाऊक नसल्याचं तिने सांगितलं. ती या गाण्याची एकही ओळ गाऊ शकली नाही. त्यामुळे चाहत्यांनी तिच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
या व्हिडीओखाली एकाने कमेंट करत असे म्हटले आहे की, “ही गायिका आहे ना? मग इतकं लोकप्रिय गाणं माहीत नाही का हिला? तर दुसऱ्याने “मराठी कलाकार आहात आणि तुम्हालाच मराठी गाणी येत नाहीत” तर आणखी एकाने “खरंच अरुंधती? एवढं सोपं गाणं नाही आलं तुला?’ असं म्हटलं आहे तर एकाने काय फायदा गायिका असूनही हिला इतकं सोपं गाणं ओळखता आलं नाही का?” असं म्हणत टीका केली आहे.


दरम्यान स्टार प्रवाहच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून . व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी या कमेंट्सद्वारे मधुराणीवर नाराजी व्यक्त केली आहे.