गेले काही अभिनेता, लेखक व दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे हा खूप चर्चेत आहे. ‘चला हवा येऊ द्या’नंतर संपूर्ण निलेश साबळे त्याचा नवाकोरा शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘चला हवा येऊ द्या’नंतर संपूर्ण महाराष्ट्राला हसवायला कलर्स मराठी या वाहिनीवर ‘हसताय ना, हसायलाच पाहिजे’ या नवीन घेऊन आला आहे. त्याच्या साथीला विनोदवीर भाऊ कदम ओंकार भोजने यांच्यासह स्नेहल शिदम, सुपर्णा श्याम आणि इतर काही कलाकारदेखील आहेत. नुकताच गेल्या आठवड्यात या शोचा पहिला भाग प्रदर्शित झाला.
‘हसताय ना?, हसायलाच पाहिजे’ या शोच्या पहिल्या भागांत ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची संपूर्ण टीम आली होती. अभिनेत्री सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, दीपा परब, सुचित्रा बांदेकर, वंदना गुप्ते यांच्यासह केदार शिंदेदेखील यात सहभागी झाले होते. अशातच या शोच्या आगामी भागाचा एक प्रोमोदेखील चाहत्यांच्या भेटीला आला आहे. यांमध्ये जुनं फर्निचर या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक महेश मांजरेकर व मेधा मांजरेकर यांच्यासह उपेंद्र लिमये व सचिन खेडेकर यांनीही उपस्थिती लावली आहे. यावेळी ‘हसताय ना?, हसायलाच पाहिजे’मधील कलाकारांनी त्यांच्यासाठी खास स्किट सादर केले. याची झलकही पाहायला मिळत आहे.
यामध्ये एका स्किटदरम्यान, स्नेहल शिदम व रोहित चव्हाण एकमेकांवर बर्फ उडवताना दिसत आहेत. यावेळी निलेश साबळे त्यांना तुम्ही एकमेकांवर बर्फ का उडवत आहात असं विचारतो. यावर स्नेहल “आम्हाला कितीतरी दिवसांपासून कश्मीरला जायचं होतं” असं म्हणते. यावर निलेश पुन्हा रोहितला “काश्मीरला का गेला नाहीत?” असं विचारतो. यावर रोहित त्याला उत्तर देत असं म्हणतो की, “आम्हाला हनिमूनसाठी काश्मीरला जायचं होतं. पण तिथे जायच्या आधीच आम्हाला मुलं झाली.” त्यांच्या या विनोदावर व मेधा महेश मांजरेकरांसह उपेंद्र लिमये व सचिन खेडेकरही हसायला लागतात.
‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या शोचं लेखन, दिग्दर्शन डॉ. निलेश साबळे यांनी केलं आहे. तर भाऊ कदम, ओंकार भोजने या विनोदवीरांबरोबरच सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम, रोहित चव्हाणसह अनेक कलाकार शोच्या टीममध्ये समाविष्ट आहेत. हा शो दर शनिवार-रविवार रात्री नऊ वाजता कलर्स मराठी वहिनीवर प्रदर्शित होतो.