शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी पहिल्यांदा व्हिडीओ पाहिला तेव्हा…”, अखेर डीपफेक व्हिडीओबाबत रश्मिका मंदाना माध्यमांसमोर बोलली, म्हणाली, “हे प्रकरण काही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 28, 2023 | 10:31 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Rashmika Mandanna On Deepfake Video

"मी पहिल्यांदा व्हिडीओ पाहिला तेव्हा…", अखेर डीपफेक व्हिडीओबाबत रश्मिका मंदाना माध्यमांसमोर बोलली, म्हणाली, "हे प्रकरण काही…"

बॉलिवूड कलाकार सध्या डीपफेक व्हिडीओचे शिकार बनले आहेत. डीपफेक व्हिडीओमुळे ही कलाकारमंडळी बरीच घाबरलेली पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला रश्मिका मंदाना त्या पाठोपाठ कतरीना कैफ, काजोल देवगण, आलिया भट्ट हे कलाकारही सिनेसृष्टीत डीपफेक व्हिडीओला सामोरे गेले. बऱ्याच कलाकार मंडळींनी या डीपफेक व्हिडीओबाबत आवाज उठवला, तर काहींनी कलाकारांना पाठिंबाही दर्शविला. अशातच अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने पहिल्यांदाच माध्यमांसमोर डीपफेक व्हिडीओ प्रकरणावरून भाष्य केलं आहे. (Rashmika Mandanna On Deepfake Video)

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे व अभिनयामुळे चर्चेत असते. सध्या ती तिच्या ‘अ‍ॅनिमल’ या आगामी चित्रपटामुळे विशेष चर्चेत असलेली पाहायला मिळतेय. या चित्रपटात ती पहिल्यांदाच अभिनेता रणबीर कपूरसह स्क्रीन शेअर करणार आहे. ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरु असलेलं पाहायला मिळत आहे. हैदराबाद येथील एक प्रमोशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रश्मिका डीपफेक व्हिडीओबाबत स्पष्टपणे बोलताना दिसत आहे.

आणखी वाचा – भर कार्यक्रमात ‘देवाक काळजी’ गाणं न म्हणता आल्यामुळे मधुराणी प्रभुलकर ट्रोल, नेटकऱ्यांनी सुनावलं, म्हणाले, “गायिका असूनही…”

यावेळी बोलताना रश्मिका म्हणाली, “मी जेव्हा पहिल्यांदा डीपफेक व्हिडीओ पाहिला तेव्हा खूप घाबरले होते. मला वाटलं माझ्या टीमकडून मला कुठलाही पाठिंबा मिळणार नाही. सर्वात पहिल्यांदा पाठिंबा देणारे व्यक्ती अमिताभ बच्चन होते. त्यानंतर अनेकांनी मला पाठिंबा दिला. सुरुवातीला डीपफेक व्हिडीओचा माझ्यावर खूप परिणाम झाला. हे डीपफेक प्रकरण काही सर्वसाधारण नाही त्यामुळे मी यावर बोलण्याचा निर्णय घेतला” असं रश्मिका म्हणाली.

Rashmika About her Deepfake Video at Animal Press meet.#AnimalMovie #RashmikaMandanna pic.twitter.com/swa8QVOYvW

— Lok???? (@TeluguOchu) November 27, 2023

आणखी वाचा – ‘धर्मवीर २’ हिंदीमध्येही प्रदर्शित होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, म्हणाले, “गुजरात, राजस्थानमध्ये…”

पुढे रश्मिका म्हणाली, “मी जगभरातल्या सर्व मुलींना सांगू इच्छिते की, हे सामान्य नाही आहे. जर एखाद्या गोष्टीचा तुमच्यावर परिणाम होत असेल तर शांत बसण्याची गरज नाही. तुम्ही त्यावर प्रतिक्रिया देऊ शकता आणि लोकं तुम्हाला नक्कीच पाठिंबा देतील. आपण जिथे राहत आहोत तो एक चांगला देश आहे” असं म्हणत इतरांना लढण्याची उमेद तिने दिली.

Tags: animal moviedeepfake videoentertainmentrashmika mandannaRashmika Mandanna Deepfake Videosouth actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
zee marathi chala hawa yeu dya comedy show will be start again dr nilesh sabale shared video on social media

'चला हवा येऊ द्या' पुन्हा येणार?, निलेश साबळेने व्हिडीओ शेअर करत दिली माहिती, म्हणाला, "आता फक्त..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.