सन मराठी या वाहिनीवर ‘कन्यादान’ या लोकप्रिय मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या चेतन गुरवचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा संपन्न झाला होता. चेतनच्या साखरपुड्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. चेतनच्या साखरपुड्याला त्याच्या मालिकेतली टीम तसेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात यांसारख्या अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. या कलाकारांनी ही चेतनच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
अशातच हा अभिनेता आज विवाहबंधनात अडकला आहे. पायल हरमळकरबरोबर चेतनने आपली विवाहगाठ बांधली आहे. काही वेळापूर्वी त्याने त्याचे हळदीच्या लूकमधील एक खास फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये त्याने पेस्टल रंगाचा कुर्ता परिधान केला असून त्यावर आकाशी रंगाचा शेला घेतला आहे. तसेच पिवळ्या रंगाचा गॉगल व डोक्याला मुंडावल्या बांधलेल्या या खास लूकमध्ये चेतन खूपच देखणा दिसत आहे.
वनिता खरातने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे चेतन व पायलच्या लग्न सोहळ्यातील काही खास क्षण शेअर केले आहेत. यामध्ये हे चेतन व पायल दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये कुर्ता, धोतर डोक्यावर फेटा व कपाळी मुंडावल्या असा खास लूक असल्याचे पाहायला मिळत आहे. वनिताने हा खास व्हिडीओ शेअर करत त्यावर चेतनला ‘नवरदेव’ असंही म्हटलं आहे. तर त्याच्या शेजारी त्याची पत्नीही बसलेली दिसत आहे. पत्नी पायलने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
चेतनने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नव्या आयुष्याची सुरुवात केली. थाटामाटात साखरपुडा केल्या नंतर आता हा अभिनेता विवाहबंधनातदेखील अडकला आहे. दरम्यान, चेतनच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्याने ‘कन्यादान’ या मालिकेपूर्वी ‘वैजू नंबर १’ या मालिकेतही काम केलं आहे. अशातच त्याच्या या लग्नाचा व्हिडीओदेखील चांगलाच व्हायरल होत आहे.