मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘नवरी मिळे हिटलर’चा एजे मालिकेत परिधान करतो सूट-बूट, पण सेटवर अशी असते त्याची खरी परिस्थिती, समोर आलं सत्य

Saurabh Moreby Saurabh More
मे 2, 2024 | 6:41 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navri Mile Hitlerla fame AJ and Leela’s funny video viral on social media.

Video : ‘नवरी मिळे हिटलर’चा एजे मालिकेत परिधान करतो सूट-बूट, पण सेटवर अशी असते त्याची खरी परिस्थिती, समोर आलं सत्य

देशभरात तापमानात मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रातीलही अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील नागरिक उकाड्याने पुरते हैराण झाले आहेत. अनेकजण दिवसभरात अनेकदा अंघोळ करून शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.उकाड्यापासून बचाव करण्यासाठी अनेक मंडळी अनेक जुगाड करत आहेत. असाच एक जुगाड मराठी मनोरंजन विश्वातील एका मालिकेच्या कलाकारांनी केला आहे.

झी मराठी वहिनीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेमधील एजे व लीला यांनी या उकाड्यापासून वाचण्यासाठी एक नामी शक्कल लढवली आहे आणि या शक्कलेचा व्हिडीओही त्यांनी सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. Arti tales (आरती हरयन) या इन्स्टाग्राम पेजद्वारे हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओमध्ये एजे व लीला अर्थात वल्लरी विराज व राकेश बापट दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Aarti Haryan (@aartis_tales)

आणखी वाचा – ‘कन्यादान’ फेम सुप्रसिद्ध अभिनेताचा विवाहसोहळा संपन्न, हळदीत नवरदेवासह वनिता खरातचाही राडा, फोटो व व्हिडीओ व्हायरल

मालिकेत एजे म्हणजेच अभिनेता राकेश बापट हा कायमच सुटाबुटात असलेला पाहायला मिळतो. मात्र गरमीमुळे उकाड्यापासून वाचण्यासाठी त्याने शर्ट, टाय व त्यावर ब्लेझर असा वेश तर केला आहे, मात्र त्याखाली त्याने पॅंट वगैरे न घालता पायजमा परिधान केला असल्याचे पाहायला मिळत आहे. आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे त्यापासून वाचण्यासाठी एजे अर्थात राकेशने केवळ क्लोजअप शॉटसाठी हा खास वेष केला आहे.

आणखी वाचा – मधुचंद्र काश्मीरला करायचा होता पण मग त्याआधीच…; ‘हसताय ना?, हसायलाच पाहिजे’च्या विनोदवीरांचे भन्नाट सादरीकरण

दरम्यान, उन्हाळ्यात उकाड्यापासून वाचण्याची त्यांची ही नामी शक्कल अनेकांना आवडली आहे. या व्हिडीओवर एजे व लीलाच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. तसेच उकाड्यापासून वाचण्यासाठी ही खूप भन्नाट कल्पना असल्याची प्रतिक्रियाही यावर व्यक्त केल्या आहेत.        

Tags: marathi entertainment newsNavri Mile HitlerlaRakesh BapatVallari Viraj
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Ashutosh Gowariker praised Gautami Deshpande's play 'Galib' post viral

बॉलिवूडच्या बड्या दिग्दर्शकाने पाहिलं गौतमी देशपांडेचं मराठी नाटक, अभिनेत्री भारावून गेली अन्…; म्हणाली, "ज्यांचे सिनेमे पाहून मोठी झाले…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.