बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

१२ अफेअर, लग्नाच्या दोन वर्षांतच घटस्फोट अन्…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला ५२व्या वर्षी करायचं आहे दुसरं लग्न, म्हणाली, “माझ्या नशिबात…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 2, 2024 | 5:16 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
manisha koirala on relationship

१२ अफेअर, लग्नाच्या दोन वर्षांतच घटस्फोट अन्...; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला ५२व्या वर्षी करायचं आहे दुसरं लग्न, म्हणाली, "माझ्या नशिबात..."

सध्या प्रसिद्ध निर्माते संजय लीला भन्साळी यांची नवीन वेबसीरिज चांगलीच चर्चेत आली आहे. ‘हिरामंडी – द डायमंड बाजार’ ही नवीन सीरिज कालच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजमध्ये मनोरंजन क्षेत्रातील मोठे कलाकार पाहायला मिळत आहेत. यामध्ये ऋचा चढ्ढा, सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोइराला, आदिती राव, संजीदा शेख, फरदीन खान, शेखर सुमन हे काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक कलाकारांनी कमबॅक केला आहे. त्यामुळे त्यांच्या अभिनयाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (manisha koirala on relationship)

‘हिरामंडी’च्या निमित्ताने मनीषा कोइराला, फरदीन खान, शेखर सुमन, फरीदा जलाल यांनी खूप वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. यामध्ये मनीषा या मालिकेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली आहे. त्यामुळे तिला पाहून चाहत्यांना खूप आनंद झालेला दिसून येत आहे. यावेळी वेबसिरीजच्या प्रमोशनदरम्यान मनीषाने माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक खुलासे केले आहेत. यामध्ये तिने अफेअर्स व घटस्फोट यावर भाष्य करताना दिसली आहे.

आणखी वाचा – कर्जाचे हफ्ते रखडले, बँकांमधून फोन, घरही विकलं अन्…; राष्ट्रीय पुरस्कार मिळूनही प्रसाद ओकची झाली होती बिकट परिस्थिती, म्हणाला, “बायकोच्या स्वप्नांवर…”

View this post on Instagram

A post shared by Manisha Koirala (@m_koirala)

आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम यावे अशी अपेक्षा आहे असे सांगताना ती म्हणाली की, “मला नेहमी वाटते की माझ्या आयुष्यात कोणीही पुरुष असेल, किंवा माझ्या आयुष्यात एखादा साथी असेल तर माझ्यासाठी ते खूप चांगले असेल. पण यासाठी मला प्रमाणिक व्हावं लागेल. त्याची वाट बघून मला माझा वेळ वाया घालवायचा नाही आहे. माझ्या नशिबात जर तो असेल तर चांगलेच आहे आणि नसेल तरीही ठीक आहे. मी सध्या माझ्या आयुष्यात जशी आहे तशी खुश आहे”.

आणखी वाचा – “त्यांच्याबरोबर सध्या बोलणं नाही पण…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील मित्रांनी शो पाहिला का? विचारताच ओंकार भोजनेचं उत्तर, म्हणाला, “जेव्हा ते बघतील…”

पुढे ती म्हणाली की, “मला खूपच चांगले कुटुंब मिळाले आहे. माझ्यावर प्रेम करणारे आई वडील, भाऊ-बहीण व समजून घेणारे मित्र-मैत्रिणी मिळाले आहेत. तसेच माझे कामदेखील खूप चांगले सुरु आहे. मला फिरायला आवडतं. मी मानसिकरित्या, शारीरिकरित्या व भावनात्मकरित्या खूप खुश आहे. पण जर माझ्याकडे एखादा साथीदार असतं तर मला अजून आनंद झाला असता”.

मनीषाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर २०१० साली तिने नेपाळी बिजनेसमॅन सम्राट दहल बरोबर लग्न केले होते. मात्र काही वर्षातच दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. तसकह बॉलिवूडमध्येही तिचे नाव अनेक कलाकारांशी जोडले गेले होते. काही वर्षापूर्वीच तिने कर्करोगाशी सामना देखील केला आहे. पण त्यातून ती आता पूर्णपणे बरी झाली आहे.    

Tags: actressmanisha koiralarelationship
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Hastay Na Hasayalach Pahije show new promo out

मधुचंद्र काश्मीरला करायचा होता पण मग त्याआधीच…; ‘हसताय ना?, हसायलाच पाहिजे’च्या विनोदवीरांचे भन्नाट सादरीकरण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.