शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“दोघांचे संबंध असल्याचं…”, स्वतःच्या मित्रावरुन पत्नीवर संशय घ्यायचे रवींद्र महाजनी, गश्मीरच्या आईचा गौप्यस्फोट, म्हणाल्या, “माझ्यावरचा विश्वास…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 8, 2024 | 7:04 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ravindra Mahajani was beating his wife she revealed in her book see the details

"दोघांचे संबंध असल्याचं...", स्वतःच्या मित्रावरुन पत्नीवर संशय घ्यायचे रवींद्र महाजनी, गश्मीरच्या आईचा गौप्यस्फोट, म्हणाल्या, "माझ्यावरचा विश्वास..."

काही दिवसांपूर्वीच दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी महाजनी यांचे ‘चौथा अंक’ हे आत्मचरित्र प्रकाशित झाले. हे पुस्तक प्रकाशित होण्याच्या काही महिन्यांपूर्वीच रवींद्र महाजनी यांचे अनपेक्षित निधन झाले. मात्र त्यांच्या निधनापूर्वीच माधवी यांनी हे पुस्तक लिहून पूर्ण केले होते. यात माधवी यांनी रवींद्र यांच्याबद्दलचे अनेक खुलासे केले आहेत. रवींद्र हे माधवी यांच्यावर संशय घेऊन त्यांना मारहाण करत असल्याचाही धक्कादायक खुलासा केला आहे. माधवी यांनी हा प्रसंग सांगण्याआधी संदर्भ म्हणून एक घटना सांगितली आहे.

पुण्याजवळील एक वादग्रस्त जमीन विकण्यासाठी रवींद्र महाजनींचा एक मित्र त्यांच्या मागे लागला होता. रवींद्र महाजनींची एका इन्कम टॅक्स कमिशनरची ओळख होती. त्यामुळे त्यांच्या या ओळखीचा फायदा घेऊन ही वादग्रस्त जमीन विकली जावी, यासाठी त्यांचा तो मित्र रवींद्र यांच्या मागे लागला होता. पण रवींद्र यांनी यात पडू नये असं माधवी यांना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी बेकायदेशीर गोष्टींत रवींद्र यांना न पडण्याचा सल्ला दिला आणि रवींद्र यांनी पत्नीचा हा सल्ला ऐकलादेखील. पण हा व्यवहार न झाल्यामुळे रवींद्र यांचा तो मित्र माधवी यांच्यावर नाराज झाला आणि त्यांना अद्दल घडवण्यासाठी तो माधवी यांच्याविरुद्ध रवींद्र यांचे कान भरू लागला.

आणखी वाचा – “‘मोरुची मावशी’ सारखं नाटक करुनही…”, वडिलांना एकही पुरस्कार नसल्याची लेक वरद चव्हाणला खंत, म्हणाला, “दुर्देवी गोष्ट आहे की….”

या मित्रामुळे रवींद्र महाजनी पत्नीवर संशय घेऊन त्यांना माराहण करत असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. याबद्दल माधवी यांनी या पुस्तकात असं म्हटलं आहे की, “अलीकडे रवी कोल्हापूरच्या त्याच्या चाहत्याबद्दल संशय घेऊन मला मारू लागला होता. खरंतर हा माणूस तसा स्वभावानं चांगला होता. तो उलट रवीला सांगत असे की, “तू वहिनींच्या चारित्र्याबद्दल संशय घेणं बरोबर नाही. मी तर किती वर्षांपासून वहिनींना ओळखतो. तू त्यांच्याशी नीट वाग.’ पण झालं उलटंच. जो लबाड होता, तोच रवीला चांगला वाटत होता आणि जो रवीचा हितचिंतक होता त्याच्याबद्दल रवीनं गैरसमज करून घेतला होता.”

आणखी वाचा – “तब्येत सांभाळा नाहीतर…”, सूनबाईंवर जीवापाड प्रेम करतात मृणाल कुलकर्णी, फोटो पोस्ट करत म्हणाल्या, “मास्तरीन बाई…”

यापुढे त्या असं म्हणाल्या की, “दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे पुन्हा तो मित्र व रवी दोघे त्या तथाकथित ज्योतिषाकडे गेले. त्याने पत्रिका पाहिल्यावर माझी निंदा करायला सुरुवात केली. “ही तुमच्याशी एकनिष्ठ नाही. हिचं तुमच्या मित्राशी अफेअर आहे. ही तुमच्या पाठीत खंजीर खुपसतेय वगैरे वगैरे…” मला पुष्कळ नावंही ठेवली. रवींद्रचा स्वभाव आधीच संशयी बनला होता. त्यात या गोष्टीमुळं भरच पडली. ज्योतिषानं रवीच्या त्या चांगल्या मित्राचं नाव माझ्याशी जोडून ह्या दोघांचे संबंध असल्याचं त्याला सांगितलं. रवींद्रच्या त्या मित्रानं त्या ज्योतिषाला आधीच सांगून ठेवलं होतं. नंतर असंही कळलं की, ते दोघे बांधकाम व्यवसायात पार्टनर होते. याचा अर्थ मी रवीला जागेबाबत जो सल्ला दिला, त्यामुळे त्या मित्राचं आर्थिक नुक्सान झालं होतं आणि त्याचा तो अशा तन्हेनं सूड घेऊ पहात होता. दुर्दैवानं त्याला तशी संधीही मिळाली. रवीचा माझ्यावरचा विश्वास उडला होता. त्यामुळे तो सहज त्याच्या डावाला बळी पडला.”

Tags: bollywood newsentertainment newsmarathi actormarathi entertainment newsMarathi newsravindra mahajaniमनोरंजन बातमीमराठी अभिनेतेमराठी बातमीरवींद्र महाजनी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
South actress Shantipriya recently opened up about her divorce and current relationship in an interview

"आम्ही घटस्फोटापर्यंत…", 'अशी ही बनवाबनवी'मधील शंतनूच्या बायकोचा बऱ्याच वर्षांनी खुलासा, ४०शीमध्येचं झालं होतं निधन, म्हणाली, "खूपच वाईट…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.