मराठी मनोरंजन विश्वातील सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी रांगोळे. शिवानी व विराजस अनेक वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत होते आणि त्यानंतर दोन वर्षांपूर्वी त्यांनी एकमेकांना आयुष्याचं जोडीदार म्हणून निवडलं. विराजसची आई व प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची शिवानी यांच्या सासू-सुन या नात्यापेक्षा त्या एकमेकांच्या खूप छान मैत्रिणी आहेत. त्या दोघींमध्ये खूप छान बाँडिंग आहे आणि याचा प्रत्यय वेळोवेळी आला आहे.
‘झी मराठी’वर लवकरच दोन नवीन मालिका येणार आहेत. या मालिकांच्या प्रमोशनसाठी नुकतंच मृणाल कुलकर्णी यांनी सुनेसह एकत्र शूटिंग केलं. याचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शिवानी सतत शूटिंगमध्ये व्यग्र असल्याने तिच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होत असल्याची चिंता मृणाल यांनी या पोस्टद्वारे व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी आपल्या लाडक्या सुनेला एक प्रेमळ सल्लादेखील दिला आहे.
![](https://marathi.itsmajja.com/wp-content/uploads/2024/02/image-34.png)
मृणाल यांनी त्यांच्या फेसबुकवर सुनेसह खास फोटो शेअर करत “मास्तरीण बाई, काम झक्कास करताय. पण खाणं-पिणं आणि तब्येतही सांभाळा. नाहीतर आम्हीच शिकवू चांगला धडा!” असं म्हटलं आहे. त्यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. नेटकऱ्यांनी या पोस्टवर “मस्त बोलल्या सासूबाई, तुमच्या सूनबाई अतिशय सुंदर अभिनय करतात, कित्ती गोड हे रागावणे सासूबाई, किती मस्त, छान, समजून काम करते आहे.” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.
दरम्यान, शिवानी ही ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अक्षरा उर्फ मास्तरीण बाई हे पात्र साकारत आहे. लग्नानंतर ती या मालिकेच्या शूटिंगमध्ये पूर्णपणे व्यग्र आहे. त्यामुळे तिच्या सासूने तिच्याच मालिकेच्या शीर्षकावरुन एक प्रेमळ सल्ला दिला आहे. त्यामुळे या सासू-सुनेच्या जोडीचे चांगलेच कौतुक होत आहे.