शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 30, 2024 | 5:51 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Maharashtra bhushan award announced to ashok saraf see the details

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Maharashtra Bhushan Award : मराठी नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते म्हणजे अशोक सराफ. गेली पाच दशके त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीसह हिंदी सिनेविश्वातही त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मनोरंजन सृष्टीतील त्यांच्या या योगदानासाठी त्यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ या वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच  मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानिमित त्यांचे अभिनंदनही केले.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – पुलकित-क्रिती लवकरच अडकणार लग्नबंधनात, साखपुड्याचे फोटो आले समोर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांचे कौतुक करत असे म्हटले की, “अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून  घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले आहे. “

आणखी वाचा – बालीमध्ये हनिमून, मॅचिंग टॅटू, अन्…; आयरा-नूपुरची लग्नानंतरची पहिली ट्रीप, फोटो तुफान व्हायरल

दरम्यान, अशोक सराफ यांनी त्यांना हा पुरस्कार मिळाल्यानिमित्त आनंदाची व अभिमानाची भावना व्यक्त केली आहे. तसेच त्यांना हा पुरस्कार जाहीर होताच चाहत्यांस मनोरंजन विश्वातून अनेक कलाकार मंडळींकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Tags: ashok sarafentertainment newsmaharashtra bhushanMaharashtra Bhushan Awardsmarathi actormarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsअशोक सराफमनोरंजन बातमीमराठी अभिनेतेमराठी बातमीमराठी मनोरंजनमहाराष्ट्र ब्भूषण पुरस्कारमहाराष्ट्र भूषण
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Next Post
manoj jarange patil on pushkar jog

"त्याच्याकडे संस्कार नाहीत…", पुष्कर जोगने जातीवरुन केलेल्या वादग्रस्त पोस्टवर मनोज जरांगे पाटीलांची प्रतिक्रिया, म्हणाले, "पैशांची कमी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.