रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 6, 2025 | 12:23 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shiva Marathi Serial

'शिवा' मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

Shiva Marathi Serial : मालिकांवर प्रेक्षकवर्ग भरभरुन प्रेम करतात. मालिका म्हणजे त्यांचा जीव की प्राण आहे असं म्हणणंही आता चुकीचं ठरणार नाही. कलाकार त्यांच्या आवडीनुसार मालिकांना प्राधान्य देतात. अशातच झी मराठी वाहिनीवरील बऱ्याच मालिका आहेत ज्या नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. यापैकी एक म्हणजे शिवा. गेल्यावर्षी फेब्रुवारी २०२४ मध्ये ही मालिका भेटीस आली. गेल्या एका वर्षात या मालिकेने रसिकांच्या मनात घर केलं. मालिकेतील प्रत्येक पात्रही चाहत्यांच्या मनात राज्य करत आहेत. या मालिकेतील शिवा आणि आशु या दोन महत्त्वपूर्ण पात्रांनी आजवर रसिकांची मन जिंकली. याशिवाय इतर पात्रांनीही त्यांच्या भूमिकांनी त्यांचं अस्तित्त्व दाखवून दिलं.

मालिकेतील शिवाने नेहमीच तिच्या करारी स्वभावाने स्वतःला सिद्ध केले. मालिकेत तिचा वावर हा बऱ्यापैकी पाहायला मिळतो. तर तिच्या आजूबाजूच्या दोन पात्रांबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवा मालिकेतील शिवाच्या सासूने म्हणजे मीरा वेलणकरने एक्झिट घेतली. यापाठोपाठ आता शिवाचे सासरे समीर पाटील यांनीही मालिका सोडली असल्याचं समोर आलं आहे. मालिकेतून एक नव्हे तर दोन पात्रांनी एक्झिट घेतली असल्याचं समोर येताच चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटलेला पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

View this post on Instagram

A post shared by Sameer M Patil (@patilsameer91)

शिवाच्या सासूबाई म्हणजेच सीताई यांनी मालिकेतून निरोप घेत असल्याचं भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं. तर, आता ही भूमिका यापुढे अभिनेत्री स्नेहा रायकर साकारणार असल्याचं समोर आलं. तर शिवाचे सासरे रामभाऊ यांनी देखील पोस्ट शेअर करत मालिकेतील एक्झिट बाबत सांगितलं. ही भूमिका यापुढे रमेश वाणी साकारणार आहेत. स्नेहा रायकर आणि रमेश वाणी या दिग्गज कलाकारांना यापुढे शिवा मालिकेत पाहणं रंजक ठरणार आहे.

आणखी वाचा – ‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

समीर पाटील यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटलं की, “रामचंद्र देसाई उर्फ रामभाऊ. सर्व मित्र-मैत्रिणी आणि रसिक प्रेक्षकांना सांगताना आनंद व दुःख एकत्र होतं आहे कारण, आता यापुढे ‘शिवा’ मालिकेत मी रामभाऊंची भूमिका साकारणार नाही. या भूमिकेला तुम्ही खूप प्रेम दिलं आणि वेळोवेळी तुमचं या भूमिकेवर किती प्रेम आहे हे सुद्धा मला सांगितलं, यासाठी तुम्हा प्रेक्षकांचे खूप-खूप आभार. रामभाऊ या व्यक्तिरेखेला ‘झी मराठी’चा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे याचं समाधान वेगळं आहेच. या प्रवासात खूप मित्र जोडले गेले त्यांचेही आभार. लवकरच नव्या प्रोजेक्टच्या निमित्ताने पुन्हा भेटू”.

Tags: marathi actormarathi serialshiva marathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Varun Badola on ekta Kapoor serial

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्...”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.