गेल्या कित्येक दिवसांपासून ‘हाऊसफुल ५’ चित्रपटाची जोरदार चर्चा रंगत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक ‘हाऊसफुल ५’ची आतुरतेने वाट पाहत होते. अखेरीस चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी ‘हाऊसफुल ५’ला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटगृहांबाहेरही प्रेक्षकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चनसह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज मंडळींनी ‘हाऊसफुल ५’मध्ये उत्तम भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवूडमधील हा मल्टीस्टारर चित्रपट सध्या चांगलाच गाजतोय. पण नक्की चित्रपट कसा आहे? हे प्रेक्षकांनी सोशल मीडियाद्वारे सांगितलं आहे. ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही? हेही सिनेरसिकांनी सांगितलं. (housefull 5 review)
जवळपास चार मिनिटांच्या ट्रेलरवरुनच चित्रपटाची कथा काय असणार? याचा अंदाज प्रेक्षकांना आला होता. पण कथेमध्ये बरेट ट्वीस्ट असल्याचं चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी म्हटलं होतं. ते अगदी खरं असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. चित्रपटात दोन क्लायमॅक्स असल्याचा खुलासा प्रेक्षकांनीच केला आहे. चित्रटात आलेल्या ट्वीस्टचं बरंच कौतुक होत आहे. कथेतील रंगतदारपणा प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास भाग पाडतो.
आणखी वाचा – प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”
#Housefull5 is getting all the ❤️
— AP (@AksP009) June 6, 2025
pic.twitter.com/FBNvMXZ9ut
‘हाऊसफुल ५ A’ की ‘हाऊसफुल ५ B’ कोणत्या पार्टचा शेवट? अधिक चांगला आहे हेही प्रेक्षकांनी सांगितलं. दोन भागांमध्ये चित्रपटाची कथा रंगवण्यात आली आहे. ‘हाऊसफुल ५ B’ अधिर रंगतदार आहे, पैसा वसूल चित्रपट आहे, चित्रपटाचा क्लायमॅक्स कमालीचा आहे, प्रत्येकाने एकदातरी पाहावा असा चित्रपट आहे, गोंधळ, विनोदामध्ये अडकून ठेवणारा चित्रपट आहे अशा प्रकारच्या कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत.
Inside reports —
— Kapil`ॐ (@iAKsSaviour) June 6, 2025
"#Housefull5 is one of the best film of the series and it's the mixture of confusion and comedy !!#AkshayKumar comedy is next level , 2000s akki is back"
Let's hope for the best !! ????????????pic.twitter.com/0DUnjvP9aN
‘हाऊसफुल ५’मध्ये जवळपास १५ ते २० बॉलिवूड कलाकार आहेत. चित्रपटातील प्रत्येकाची भूमिका विशेष भाव खाऊन जाते. नाना पाटेकरांचंही चित्रपटात वेगळंच वैशिष्ट्य आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांचा साधेपणा जपला आहे. तरुण मनसुखानी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केली आहे. संजय दत्त, चंकी पाडे, नरगिस फाकरी, जॅकलीन फर्नांडिस, जॉनी लिवर, जॅकी श्रॉफ आदी कलाकारांच्या ‘हाऊसफुल ५’मधील भूमिकाही विशेष उल्लेखनीय आहेत.





