गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 6, 2025 | 1:02 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Varun Badola on ekta Kapoor serial

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्...”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही...

एकता कपूरचं टेलिव्हीजन इंडस्ट्रीमध्ये योगदान मोठं आहे. तिने टीव्ही क्षेत्राचा चेहराच बदलला. एक काळ तिच्या कौटुंब मालिकांनी तुफान गाजवला. बराच ड्रामा असलेल्या मालिका प्रेक्षक अधिक आवडीने पाहतात हे एकताने पुरतं ओळखलं. त्याचाच फायदा घेत तिने बऱ्याच मालिकांची निर्मिती केली. कोशिश, क्योंकी सास भी कभी बहू थी, कुटुंब यांसारख्या मालिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. सुप्रसिद्ध अभिनेता वरुण बडोलाने एकताच्या अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. मात्र तिच्या प्रत्येक मालिकांच्या कथेच्या तो विरोधात होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एकताने टीव्ही इंडस्ट्रीची वाट लावली असल्याचं खुलेपणाने सांगितलं. (Varun Badola on ekta Kapoor serial)

‘जिंदगी विथ ऋचा’ या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत वरुणने एकताची खरी बाजू सांगितली. तो म्हणाला, “स्ट्रीची वाट लावली असल्याची पर्एकता कपूरने भारतीय टेलिव्हीजन इंडस्ट्रीचा चेहराच बदलला. ते चांगलं असो किंवा वाईट. तिच्या मालिकांमधून मोठ्या प्रमाणात कमाई होत होती. त्यातून ती अजून मजबूत होत गेली. आपल्या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा कॉर्पोरेट येतं तेव्हा तिथे कलेला महत्त्व दिलं जात नाही. ते फक्त पैसे कमावण्याच्या मागे लागतात. तुम्हाला तुमच्या पद्धतीने शो तयार करायचा असेल तर स्वतःचे पैसे त्यासाठी खर्च करा, असं एकताने एका मुलाखतीत म्हटलं होतं. पण ती चुकीचीही नव्हती”.

आणखी वाचा – Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

View this post on Instagram

A post shared by Varun Badola (@badolavarun)

“तुम्ही बऱ्याच दबावाखाली असता. एकताने एक वेगळ पाहिली आणि त्याचा फायदा उचलला. हम पांच, कोशिश एक आशा सारखे तिचे शो होते. स्टार प्लस वाहिनीवरील एका महिलेशी मी संवाद साधला होता, जी ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ मालिकेच्या विरोधात होती. ती महिला उच्च शिक्षित होती. त्यामुळे अशाप्रकारचे शो खरंच प्रेक्षक बघतील का? असा प्रश्न तिला होता. पण एकताने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत शो सुरु केला”.

“‘कहानी घर घर की’ मालिकेसह इतर सेटही एकसारखेच दिसायला लागले होते. पण एकताने कोणाचंच म्हणणं ऐकलं नाही. तुम्हालाच कळेल की, तिचे शो किती लोकप्रिय ठरले. ‘बालिका वधू’ एक उत्तम मालिका होती. ज्यामध्ये विविध पैलू दाखवण्यात आले. प्रेक्षक टीव्हीमुळे प्रभावित होतात. शो अधिक रंजक असला पाहिजे ही पहिली गोष्ट आम्हाला सांगितली जायची”.

आणखी वाचा – प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

View this post on Instagram

A post shared by EktaaRkapoor (@ektarkapoor)

“सुरुवातीलाच कटेंट संदर्भात सहमत नसल्याचं मी एकताला सांगितलं होतं. ती माझं म्हणणं ऐकणार नाही हे तेव्हाच मला कळालं होतं. तेव्हा मी फक्त छोटा अभिनेता होता. तिने त्या वेळेचा फायदा उचलला. एका व्यावसायिक महिलेच्या दृष्टीने अशाप्रकारचे शो करणं तिचा अधिकार होता. मी तिच्या एकाही शोबाबत सहमत नाही. तुझ्या शो व्यतिरिक्त मी इतरही काम करणार असं मी एकताला तेव्हाच सांगितलं होतं. तिला माहित आहे की, मी वेगळ्या प्रकारचा विचार आणि वेगळा मानसिक दृष्टीकोन असलेला अभिनेता आहे”. एकताचा खरा चेहरा वरुणने सगळ्यांसमोर आणला.

Tags: bollywood newsekta kapoorentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Akshay Kumar fitness :
Lifestyle

‘या’ बॉलिवूड अभिनेत्याने १५ वर्षांपासून खाल्ला नाहीय समोसा, वयाच्या ५९ व्या वर्षी आहे इतका फिट, कारण आहे…

एप्रिल 16, 2026 | 11:00 am
Reasons For Sugar Cravings 
Lifestyle

जेवणानंतर आपल्याला मिठाई का हवी असते?, आयुर्वेदात दडलंय याचं रहस्य, वाचा सविस्तर

एप्रिल 16, 2026 | 10:10 am
Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Next Post
 Celebs Live In Rented Houses

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.