शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 6, 2025 | 11:42 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Niranjan Kulkarni Wedding Video

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

Niranjan Kulkarni Wedding Video : कलाविश्वात कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. कलाकार मंडळी त्यांच्या आयुष्यात काय करतात हे जाणून घ्यायलाही प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. बरेचदा ही कलाकार मंडळी चाहत्यांबरोबर त्यांच्या आयुष्यातील खास क्षण शेअर करतात. काहीवेळा अचानक शेअर केलेले त्यांचे हे क्षण प्रेक्षकांना सुखद धक्का देऊन देतात. सिनेसृष्टीतील कलाकारांचे लग्न विशेषतः अनेकांच्या पसंतीस पडते. अशातच काही दिवसांपूर्वी मालिकाविश्वातील एका कलाकाराने गुपचूप लग्नगाठ बांधत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. थेट रिसेप्शनच्या व्हिडीओ पोस्ट करत त्याने ही गुडन्यूज दिली. हा अभिनेता म्हणजे निरंजन कुलकर्णी.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अभिषेक हे पात्र साकारत निरंजन घराघरांत पोहोचला. निरंजनने आजवर अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून निरंजनला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या मालिकेनेही अनेक वर्ष प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन केलं. मालिका संपल्यानंतर आता निरंजन त्याच्या गुपचूप केलेल्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने रिसेप्शनचे फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली होती. यानंतर आता अभिनेत्याने त्याच्या लग्नसोहळ्यात विधींचा व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

View this post on Instagram

A post shared by Niranjan Kulkarni (@niranjan8889)

निरंजनने त्याच्या लग्नातील पारंपरिक थाटमाट असलेला एक व्हिडीओ शेअर केला आहे. “शुभमंगल सावधान”, असं कॅप्शन देत त्याने त्याच्या शाही विवाहसोहळ्याची झलक दाखविली आहे. निरंजनने समुद्र किनारी अत्यंत दिमाखात लग्न केले. यावेळी निरंजन आणि त्याची पत्नी मनीषा गुरम यांचा मराठमोळा लूक अनेकांच्या पसंतीस पडला. निरंजनने लग्नासाठी खास पेशवाई लूक केला होता. पांढऱ्या रंगाचा सदरा आणि त्याला कॉन्ट्रास्ट असा गुलाबी रंगाचा शेला व पगडी त्याने परिधान केली. तर त्याच्या पत्नीने पिवळ्या रंगाची आणि गुलाबी काठ असलेली साडी नेसली होती. कपाळावरील चंद्रकोराने तिच्या सौंदर्यात भर पडली होती.

आणखी वाचा – प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

निरंजन व मनीषा यांचा लग्नातील मराठमोळा अंदाज खूपच खास होता. दोघांच्या लग्नात जवळचे नातेवाईक, कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित असलेला पाहायला मिळाला. निरंजनने शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेक कलाकारांनी आणि त्याच्या चाहत्यांनी पसंती दर्शविली आहे.

Tags: entertainmentmarathi actorNiranjan Kulkarni Wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Housefull 5 Review

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.