‘आर्या’ चित्रपटाच्या सेटवरुन धक्कादायक बातमी समोर आली. चित्रपटाचं शूट सुरु असताना स्टंटमॅन एस एम राजू यांचं निधन झालं. गाडीबरोबर सीन शूट करत असताना हा अपघात घडला. सगळं काही सुरळीत सुरु होतं. सीन शूट करण्यामध्ये संपूर्ण युनिट व्यग्र होतं. अशातच कार पलटी झाली. सुरुवातीच्या काही सेकंदामध्ये कोणालाच काही कळालं नाही. मात्र हा अपघात मोठा होता. जागीच राजू यांना त्यांचा जीव गमवावा लागला. राजू यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजू यांच्या कुटुंबियांची जबाबदारी त्यांचा सहअभिनेता विशाल घेणार आहे. संपूर्ण घटना समोर येताच विकी कौशलचे वडील शाम कौशल यांना मोठा धक्का बसला आहे. (sham kaushal stuntman raju)
शाम गेल्या बऱ्याच वर्षांपासून बॉलिवूडमध्ये एक्शन दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत. स्टंट मॅनच्या कामामागे किती मेहनत असते हे ते जवळून पाहत आले आहेत. राजू यांच्या निधनानंतर तर काय करावं हेच शाम यांना सुचेना. NDTV शी संवाद साधताना शाम यांनी आपलं मत व्यक्त केलं. तसेच राजू यांच्या निधनामुळे संपूर्ण कोलमडून गेलो असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
Stunt driver Mohan raj fatal accident at #Vettuvam shooting spot .
— Prashanth Rangaswamy (@itisprashanth) July 14, 2025
(Raw Unedited Footage) pic.twitter.com/D7hF85NWWY
शाम म्हणाले, “मला या अपघाताबाबत विचारलं जातं तेव्हा मला मोठ्याने रडावं अशी इच्छा होते. रडावं असं माझं मन करतं. माझ्या स्टंट कम्युनिटी, चित्रपट कम्युनिटीचं हे मोठं नुकसान आहे. मी देवाला एवढीच प्रार्थना करतो की, यापुढे अशाप्रकारच्या घटना कधीच घडू नयेत. स्टंट करत असताना सुरक्षा संबंधित थोडी जरी शंका आली तरी संपूर्ण टीम त्याकडे लक्ष देते. प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने पाहते”.
“लक्ष देऊनही, काळजी घेऊनही अपघात घडतात. निर्माते, कलाकर, चित्रपटांमध्ये काम करणारी इतर मंडळी मदत करतात. तरीही अपघात घडतात हे वाईट आहे. कधी कधी एक व्यक्ती आणि मशिन, एक व्यक्ती आणि जनावर असं चित्र असतं. स्टंटमॅनचं काम काही सोप नसतं. अशा घटनांमुळे खोलवर दुःख होतं”. राजू यांच्या निधनानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीलाच मोठा धक्का बसला आहे. घटना घडल्यानंतर राजू यांना लगेचच रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. अपघातादरम्यानचा भयावह व्हिडीओही सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे.





