शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हिंमत असेल तर…”, मराठी अभिनेत्रीचा थेट प्रशासनाला सवाल, म्हणाली, “गरिबांचा स्टॉल बंद पाडू नका”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 15, 2025 | 5:50 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Samosa Warning Controversy

"हिंमत असेल तर…", मराठी अभिनेत्रीचा थेट प्रशासनाला सवाल, म्हणाली, "गरिबांचा स्टॉल बंद पाडू नका"

Samosa Warning Controversy : ज्याप्रमाणे सिगारेटच्या पाकिटावर धोक्याचा इशारा देण्यात येतो, त्याचप्रकारे आता तेलकट आणि गोड पदार्थांच्या बाबतीतही असा इशारा देण्यात आला आहे. तेलकट-गोड पदार्थांसंभावित धोक्याचं फलक केंद्र सरकारकडून सर्व कार्यालयातील उपहारगृहांमध्ये लावण्यात येणार आहे. या पदार्थांमध्ये समोसे, वडापाव, कचोरी, पिझ्झा यांचा समावेश आहे. आणि बहुतांश कष्ट करुन आपलं घर चालवणाऱ्यांच्या यादीत वडापाव, सामोसा विक्री करणारे अधिक सर्वसामान्य आहेत. केंद्रीय सरकारने लागू केलेल्या या अटीमुळे अर्थातच याचा सर्वसामान्य उद्योजकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

जिलेबी, वडापाव यांसारख्या पदार्थांमध्ये किती तेल आणि साखर असते याची माहिती देण्यात येणार आहे. या सर्व निर्णयावर आता मराठी अभिनेत्री आरती सोळंकी हिने एक पोस्ट शेअर केली आहे. “जिलेबी, समोसे याने वजन वाढतं? पिझ्झा, बर्गर, पास्ता, मोमो, चॉकलेट याने वजन वाढत नाही का?”, असं म्हणत पोस्ट शेअर केली आहे आणि संताप व्यक्त केला आहे.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : अखेर लग्न ठरलं! आदित्यचा मोठा निर्णय, पारूबरोबर सप्तपदी घेणार, अहिल्यादेवींना मान्य असेल का?, प्रोमो समोर

View this post on Instagram

A post shared by Aartii Sharu Solankii (@aartiisolankii135)

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने तिचे मत व्यक्त केले आहे. त्यात ती म्हणाली की, “गव्हर्नमेंटने हिंमत असेल तर चीजचे जेवढे पदार्थ आहेत त्यावर बंदी आणावी. वडापाव, समोसा, जिलेबी ही आमची जान आहे. डोमिनोज, पिझ्झा हट, मॅकडोनाल्ड, डेरी प्रॉडक्ट यावर बंदी आणा. आमच्या कष्ट करुन वडापाव, समोसा पाव विकणाऱ्या गरिबांचा स्टॉल बंद पाडू नका”.

आणखी वाचा – सावध व्हा! हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेय, वाचण्यासाठी वेळीच घ्या काळजी, काळी द्राक्षे, पालेभाज्या…

आरतीने सोशल मीडियावर ही एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने सरकारकडे एक मागणी केली. आरती सोळंकी बरेदचा सोशल मीडियावर तिचे मत व्यक्त करताना दिसते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. ‘बिग बॉस’मराठीच्या घरातही आरती सोळंकी दिसली होती. यापूर्वी तिने अनेक कॉमेडी शोमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. अभिनेत्री शेवटची स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत दिसली होती. या मालिकेत अभिनेत्रीचा बदलता लूक पाहून साऱ्यांनाच धक्का बसला.

Tags: aarti solankimarathi actressSamosa Warning Controversy
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Sidharth Malhotra Kiara Advani

मुलगी झाली हो! कियारा अडवाणी व सिद्धार्थ मल्होत्राच्या घरी चिमुकलीचे आगमन, लग्नाच्या दोन वर्षांनी झाले आई-बाबा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.