dheeraj kumar passed away : बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रख्यात दिग्दर्शक, निर्माते धीरज कुमार यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. न्यूमोनियामुळे त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. उपचार सुरु असूनही डॉक्टर त्यांचे आयुष्य वाचवू शकले नाहीत.
धीरज कुमार यांनी राजेश खन्ना आणि सुभाष घई यांच्याबरोबर चित्रपट जगतातील करिअरला सुरुवात केली. १९६५ मध्ये धीरज कुमार यांनी मनोरंजन विश्वात प्रवेश केला. राजेश खन्ना या प्रतिभेच्या स्पर्धेत ते विजेते होते. वर्षानुवर्षे धीरज यांनी स्वत: साठी एक अनोखा मार्ग तयार केला. १९७० ते १९८४ दरम्यान २१ पंजाबी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आणि त्यानंतर त्यांनी दूरदर्शन निर्मितीमध्ये प्रवेश केला.
आणखी वाचा – ज्येष्ठ अभिनेते धीरज कुमार यांची प्रकृती चिंताजनक, वयाच्या ७९व्या वर्षी व्हेंटिलेटरवर देत आहेत मृत्यूशी झुंज
धीरज कुमार यांचे खरे नाव धीरज कोचर आहे. त्यांचा जन्म १ ऑक्टोबर १९४४ रोजी झाला होता. ‘क्रिएटिव्ह आय लिमिटेड’ प्रॉडक्शन हाऊस सुरु करणारे धीरज हे बॉलिवूड आणि पंजाबी या दोन्ही चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून ओळखले जाऊ लागले. ‘कहां गए वो लोग’ (१९८६) (निर्देशक), ‘अदालत’ (१९८६), ‘ये प्यार ना होगा कम’ (२००९), ‘सिंहासन बत्तीसी’ (२०१४), ‘नीम नीम शहद शहद’ (२०११) , ‘मायका’ (२००७) यांमध्ये धीरज यांनी महत्त्वपूर्ण काम केले. याशिवाय टेलिव्हिजन जगतातही त्यांनी बरेच काम केले आहे.





