शनिवार, मे 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Paaru Marathi Serial : अखेर लग्न ठरलं! आदित्यचा मोठा निर्णय, पारूबरोबर सप्तपदी घेणार, अहिल्यादेवींना मान्य असेल का?, प्रोमो समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 15, 2025 | 3:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Zee Marathi Paaru Serial

Paaru Marathi Serial : अखेर लग्न ठरलं! आदित्यचा मोठा निर्णय, पारूबरोबर सप्तपदी घेणार, अहिल्यादेवींना मान्य असेल का?, प्रोमो समोर

Zee Marathi Paaru Serial  : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ ही मालिका गेले दिड वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत प्रेक्षकांना पारू आणि आदित्यची अनोखी प्रेमकहाणी पाहायला मिळत आहे. मात्र त्यांच्या या नात्याला पारूच्या वडिलांचा विरोध असतो. याशिवाय या दोघांच्या ही नात्याचं सत्य अहिल्यादेवीला माहित नसतं. तर आता आदित्य-पारूची प्रेमकहाणी एक पाऊल पुढे कशी जाणार? याची उत्सुकता आता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. अहिल्यादेवीची प्रत्येक गोष्ट ऐकणाऱ्या आणि आदित्यवर जीवापाड प्रेम करणाऱ्या पारूने प्रत्येकाचं मन जिंकून घेतेल आहे.

जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान आदित्य आणि पारूचं खोटं लग्न झालेले असतं. पण, ‘पारू’ याच नात्याला आपलं सर्वस्व मानते. तर आता पारूच्या निःस्वार्थ प्रेमाची जाणीव अखेर आदित्यला होणार आहे. खोट्या लग्नाच्या आठवणी, पारूचं निस्वार्थ प्रेम आणि दिशाचे टोमणे या सगळ्या गोष्टी आदित्यच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करतात. तर आता आदित्य पारूशी लग्न करण्याचा धाडसी निर्णय घेणार आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज अपयशी, मृत्यूची बातमीही लपवून ठेवली, नेमकं प्रकरण काय?

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

तर झी मराठीने सोशल मीडियावर या मालिकेचं प्रोमो शेअर केला आहे. ज्यात आदित्यला पारूच्या प्रेमाची जाणीव होताना दाखवण्यात आली आहे आणि आता आदित्य अखेर पारुशी लग्न करण्याचा निर्णय घेतो आणि आता काहीही झालं तरी माझ्या आणि पारूच्या नात्याला न्याय दिलाच पाहिजे त्यासाठी पारूशी लग्न करणं हाच एकमेव मार्ग असं तो मनात ठरवतो. तर आता आदित्यने घेतलेल्या या निर्णयाला अहिल्या पाठिंबा देणार का? आणि आदित्य -पारूच खरंच लग्न होणार का?, याची उत्सुकता आता मालिकेचा प्रोमो पाहून लागली आहे.

आणखी वाचा – ज्येष्ठ अभिनेते धीरज कुमार यांची प्रकृती चिंताजनक, वयाच्या ७९व्या वर्षी व्हेंटिलेटरवर देत आहेत मृत्यूशी झुंज

‘पारू’ मालिकेत आता पुन्हा एकदा दिशा नावाचं वादळ परतलं आहे. दिशाच्या येण्याने मालिकेत नवनवे ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. इतकंच नाहीतर दिशाने आदित्य व पारूच्या नात्यात विघ्न आणण्यास सुरुवात केली आहे. आता दिशामुळे मालिकेत काही विघटित तर घडणार नाही ना याकडेही प्रेक्षकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

Tags: marathi serialpaaru serialzee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
 cholesterol and heart attack

सावध व्हा! हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेय, वाचण्यासाठी वेळीच घ्या काळजी, काळी द्राक्षे, पालेभाज्या…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.