गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वैष्णवीचे परपुरुषाशी संबंध, चॅट अन्…; वकिलांच्या आरोपांवर भडकला मराठी अभिनेता, म्हणाला, “बुरसटलेले, चुकीचे पुरुषी विचार…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 29, 2025 | 12:58 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Vaishnavi Hagawane Death Case

वैष्णवीचे परपुरुषाशी संबंध, चॅट अन्...; वकिलांच्या आरोपांवर भडकला मराठी अभिनेता

वैष्णवी हगवणे प्रकरणाबाबत दिवसेंदिवस नवनवीन माहिती समोर येत आहेत. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर हगवणे कुटुंबियांनीच तिची हत्या केली असल्याचं समोर आलं. याचसंदर्भात पोलिस कसून चौकशी करत आहेत. दरम्यान हगवणे कुटुंबियांकडूनच आता वैष्णवीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हगवणे यांच्या वकिलांनी वैष्णवीचे बाहेर दुसऱ्याच व्यक्तीबरोबर संबंध असल्याचं म्हटलं आहे. यामुळे या संपूर्ण प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं आहे. १६ मेला वैष्णवीचा मृत्यू झाला. त्यानंतर हगवणे कुटुंबियांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. छळ, मारहाण यामुळे वैष्णवी त्रस्त होती. मात्र हगवणे कुटुंबियांनी आता स्वतःवरचे आरोप खोटे ठरवण्यासाठी नको नको ते आरोप केले आहे. याचप्रकरणी मराठी अभिनेत्याने शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. (Vaishnavi Hagawane Death Case)

वैष्णवी चुकीच्या व्यक्तीबरोबर चॅट करायची. त्या व्यक्तीचा लवकरच साखरपुडाही होणार होता. असे अनेक चीड आणणारे आरोप हगवणेंच्या वकिलांनी केले. हे आरोप ऐकल्यानंतर अनेकांच्या भूवयाच उंचावल्या आहेत. हगवणेंनी यामधून प्रकरणाला वेगळंच वळण देण्याचा प्रयत्न केला. वैष्णवी बाबतची एक पोस्ट शेअर करत अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमेने वकिलांनाच खडेबोल सुनावले आहेत. तसेच या पुरुषी वृत्तीचा तिरस्कार केला आहे.

आणखी वाचा – “वैष्णवीचे व्हाट्सअप चॅट तपासा”, हगवणे कुटुंबाचा वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय, वकील म्हणाले, “त्या तरुणाचा साखरपुडा…”

वकीलावरच केस फाईल करण्याची वेळ आलीय!

हे असले बुरसटलेले आणि चुकीचे पुरूषी विचार आता या काळात कोर्टात मांडणेदेखील अवमानकारक आहे…

कठीण आहे! https://t.co/2yV1ASigUQ

— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) May 28, 2025

हेमंत म्हणाला, “वकिलावरच केस फाइल करण्याची वेळ आली आहे. हे असले बुरसटलेले आणि चुकीचे पुरुषी विचार आता या काळात कोर्टात मांडणेही अवमानकारक आहे. कठीण आहे”. हेमंतच्या या पोस्टनंतर अनेकांनी कमेंटद्वारे मत व्यक्त केलं. तसेच प्रकरणाने अचानक घेतलेल्या युटर्नबाबत संताप व्यक्त केला. वकिलांनी आरोप केल्यानंतर वैष्णवी मृत्यूप्रकरणाला कोणतं वळण मिळणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

आणखी वाचा – राणी मुखर्जी व काजोलवर दुःखाचा डोंगर, कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचं निधन, बॉलिवूडही हळहळलं

अशा वकिलांना भरचौकात चाबकाने फोडून काढलं पाहिजे, या वकिलाची जास्त माहिती नाही पण त्याच्या घरातील स्त्रिया कठीण परिस्थितीत जगत आहेत, वैष्णवीसारख्या महिलांनी आपल्या नवऱ्याला सनकन कानाखाली मारली तरी काहीही बिघडणार नाही अशा अनेक कमेंट हेमंतने केल्या आहेत. वैष्णवीला न्याय मिळावा असं सातत्याने सोशल मीडियावर बोललं जात आहे. तसेच कस्पटे कुटुंबियांनीही लेकीची बाजू मांडत सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

Tags: entertainment newsmarathi actormarathi actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Girish Pardeshi Video On Fraud Alert

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या पत्नीला ऑनलाइन जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न, हजारो रुपये Gpay वर पाठवले सांगून…; धक्कादायक प्रकार समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.