बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

राणी मुखर्जी व काजोलवर दुःखाचा डोंगर, कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचं निधन, बॉलिवूडही हळहळलं

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 29, 2025 | 12:13 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
rono mukherjee passes away

राणी मुखर्जी व काजोलवर दुःखाचा डोंगर, कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचं निधन, बॉलिवूडही हळहळलं

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जीचे काका रोनो मुखर्जी यांचे निधन झाले आहे. ते ८३ वर्षांचे होते. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून रोनो यांची ओळख होती. वृद्धापकाळामुळे रोनो यांचे निधन झाले असल्याचं प्राथमिक माहितीमधून समोर आलं आहे. नक्की निधन कशामुळे झालं? याबाबत कुटुंबियांकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बुधवारी (२८ मे) रोनो यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर नातेवाईक, कुटुंबियांनी लगेचच त्यांच्या राहत्या घरी धाव घेतली. रोनो यांना शेवटचं पाहण्यासाठी बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गज मंडळींनी गर्दी केली होती. (rono mukherjee passes away)

काका रोनो यांच्या निधनाबाबत कळताच राणी मुखर्जी, तनीषा मुखर्जी व अयान मुखर्जी रोनो यांच्या घरी पोहोचले. बुधवारीच त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी मुखर्जी कुटुंबाशी नातेवाईक म्हणून जोडले गेलेले सुप्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरही हजर होते. अयान मुखर्जीचे वडील देब मुखर्जी यांची मुलगी सुनिता आशुतोष यांची पत्नी आहे. त्याच नात्याने आशुतोष अत्यंसंस्कारासाठी पोहोचले होते.

आणखी वाचा – ज्येष्ठ अभिनेत्याच्या अश्लील मॅसेज प्रकरणी प्राची पिसाटचा युटर्न?, नेटकरीही संभ्रमात, म्हणाली, “चुकीचे…”

View this post on Instagram

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

रोनो मुखर्जी हे काजोल वडील शोमू मुखर्जी यांचे भाऊ होते. सुब्बीर मुखर्जी, जॉय मुखर्जी, देब मुखर्जीही रोने यांचे भाऊ आहेत. मुखर्जी कुटुंबियच बॉलिवूडमध्ये सक्रिय होतं. या सगळ्या भावंडांनी कलाक्षेत्राला विशेष योगदान दिलं आहे. त्यामुळे रोनो यांच्या निधनानंतर संपूर्ण मुखर्जी कुटुंबिय एकवटलं होतं. तसेच बॉलिवूडमधूनही रोनो यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

आणखी वाचा – वैष्णवीचे नको ते चॅट हाती, चारित्र्यावर शंका आणि…; हगवणेंच्या वकिलाचा कोर्टात युक्तिवाद, नेमकं सत्य काय?

रोनो यांच्या निधनानंतर एका घटनेची चर्चा होत आहे. मार्च २०२५मध्ये म्हणजेच दोन ते तीन महिन्यांपूर्वीच रोनो यांचे भाऊ व अयानचे वडील देब मुखर्जी यांचं निधन झालं. देब मुखर्जी सुप्रसिद्ध अभिनेते होते. १९७७मध्ये प्रदर्शित झालेला ‘हैवान’ चित्रपट आणि १९६५मध्ये प्रदर्शित झालेला ‘तू ही मेरी जिंदगी’ चित्रपट रोनो यांनी दिग्दर्शित केला.

Tags: bollywood actorbollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Vaishnavi Hagawane death

“वैष्णवीचे व्हाट्सअप चॅट तपासा”, हगवणे कुटुंबाचा वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय, वकील म्हणाले, “त्या तरुणाचा साखरपुडा…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.