सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“वैष्णवीचे व्हाट्सअप चॅट तपासा”, हगवणे कुटुंबाचा वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय, वकील म्हणाले, “त्या तरुणाचा साखरपुडा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 29, 2025 | 12:18 pm
in Social
Reading Time: 1 min read
google-news
Vaishnavi Hagawane death

“वैष्णवीचे व्हाट्सअप चॅट तपासा”, हगवणे कुटुंबाचा वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय, वकील म्हणाले, “त्या तरुणाचा साखरपुडा…”

Vaishnavi Hagawane death : पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने सध्या एक वेगळंच वळण घेतलं आहे. या प्रकरणात वैष्णवीच आरोपी असल्याचा दावा हगवणेंच्या वकिलांनी केला आहे. ज्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. नेमकं प्रकरण काय असा प्रश्न आता उपस्थित केला जात असून वैष्णवी आत्महत्या प्रकरणाची दिशाभूल करण्यात आल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोपी हगवणे कुटुंबाला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. पती शशांक हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिष्मा हगवणे, दीर सुशील हगवणे यांची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी न्यायालयासमोर करण्यात आली. आता हे प्रकरण न्यायालयात पोहचलं आहे.

आत्महत्या केलेल्या वैष्णवी विरोधात राजेंद्र हगवणेंच्या वकिलांनी आरोप-प्रत्यारोप केल्याचं समोर आलं आहे. अमानुषपणे मारहाण करणाऱ्या, छळ करणाऱ्या हगवणे परिवाराच्या बचावासाठी कोर्टात त्यांच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे देखील उडवले. वैष्णवी नको त्या व्यक्तीबरोबर चॅट करायची असा दावा हगवणेंच्या वकिलांनी केला. सध्या वैष्णवी हगवणे हे प्रकरण आता वेगळंच वळण घेताना दिसत आहे. या प्रकरणात दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा हगवणेंच्या वकिलांकडून केला जात आहे.

आणखी वाचा – वैष्णवीचे नको ते चॅट हाती, चारित्र्यावर शंका आणि…; हगवणेंच्या वकिलाचा कोर्टात युक्तिवाद, नेमकं सत्य काय?

वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणी हगवणेंचा बचाव करणाऱ्या वकीलांनी कोर्टात युक्तिवाद करताना म्हटलं की, वैष्णवी नको त्या व्यक्तीबरोबर चॅट करायची. तिचे हे चॅट हगवणेंनी पकडले होते. त्या व्यक्तीने नकार दिल्यानेच वैष्णवीने आत्महत्या केली. वैष्णवीने १६ तारखेला आत्महत्या केली आणि १८ तारखेला त्या मुलाचा साखरपुडा झाला. यादरम्यान, ती त्याला सतत कॉल करत होती. तपास अधिकाऱ्याला त्या व्यक्तीचे नाव देण्यात आले आहे, असा दावा देखील वकिलांनी न्यायालयात केला आहे. तर याउलट, वैष्णवीच्या माहेरच्यांनी म्हणजे कस्पटे कुटुंबांनी हे आरोप चुकीचे असल्याचं माध्यमांसमोर म्हटलं आहे.

आणखी वाचा – पायलट भाचीकडून स्पेशल Announcement, पद्मश्री अशोक सराफ यांचे विमानप्रवासात कौतुक, म्हणाली, “आजचा प्रवास…”

शिवाय, हगवणेंच्या बाजूने असणाऱ्या वालिकांनी कोर्टात असाही दावा केला की, “वैष्णवीची प्रवृत्ती ही आत्महत्या करण्याचीच होती. ती ज्या व्यक्तींबरोबर चॅट करायची त्याने नकार दिला म्हणून वैष्णवीने आत्महत्या केली. शिवाय वैष्णवीचे हे चॅट तिच्या नवऱ्याच्या हातीही लागले. यावरुन त्यांच्यात वाद सुरु होता. वैष्णवीने आत्महत्या केल्याच्या दोन दिवसांनी त्या तरुणाचा साखरपुडा झाला, त्यामुळे ती व्यक्ती नेमकी कोण आहे?, त्याच्याशी तिचे नेमके काय संबंध होते?, हे तपासण्याची विनंती हगवणेंच्या वकिलांकडून करण्यात आली आहे.

Tags: pune crime newssucide newsVaishnavi Hagawane death
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Vaishnavi Hagawane Death Case

वैष्णवीचे परपुरुषाशी संबंध, चॅट अन्...; वकिलांच्या आरोपांवर भडकला मराठी अभिनेता, म्हणाला, “बुरसटलेले, चुकीचे पुरुषी विचार...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.