सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या पत्नीला ऑनलाइन जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न, हजारो रुपये Gpay वर पाठवले सांगून…; धक्कादायक प्रकार समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 29, 2025 | 1:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Girish Pardeshi Video On Fraud Alert

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या पत्नीला ऑनलाइन जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न, हजारो रुपये Gpay वर पाठवले सांगून…; धक्कादायक प्रकार समोर

Girish Pardeshi Video On Fraud Alert : गेल्या काही दिवसांत ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. काही वर्षांपूर्वी घरात घुसून केली जाणारी चोरी आता थेट मोबाईलमध्ये घुसून केली जात आहे. आणि यांत अनेकजण भरडले जात आहेत. कित्येक सर्वसामान्यांचे बँक अकाउंट्स रिकामी झाले आहेत. काहीजण वेळीच सावध होतात तर काही या घोटाळ्यात अडकले जातात. या घोटाळ्याप्रकरणी मराठमोळ्या अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत नागरिकांना आवाहन केलं आहे. अभिनेता गिरीश परदेशीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना सावध केले आहे. ऑनलाईन फ्रॉडची शिकार होण्यापासून अभिनेत्याची पत्नी बचावली आहे. आणि त्यांचे मोठे नुकसान होता होता राहिले आहे. या संदर्भातील एक व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने सावधतेचा इशारा दिला आहे.

गिरीश परदेशीने व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं की, “मित्रांनो एक धोक्याची सूचना आहे. आता थोड्या वेळापूर्वी माझी पत्नी प्रतिक्षाच्या फोनवर एका बाईने फोन करुन सांगितलं की, मी (अभिनेत्याने स्वत:) प्रतिक्षाला १३ हजार रुपये गुगल पेवर पाठवयाला सांगितले आहेत. त्या बाईने प्रतिक्षाच्या गुगल पेवर पहिल्यांदा १० हजार पाठवले आणि मग तीन हजारऐवजी ३० हजार रुपये पाठवले. त्या दोन्ही व्यवहारांचे स्क्रिनशॉट तिला व्हाट्सअप केले. तिने पुन्हा फोन करुन माझ्या पत्नीला सांगितले की, तिने चष्मा घातला नव्हता आणि म्हणून तीन हजारांऐवजी ३० हजार पाठवले आहेत. मी तुम्हाला स्क्रिनशॉट पाठवला आहे, माझा स्कॅनर कोडही पाठवते आणि तुम्ही मला उरलेले २७ हजार रुपये पाठवा”.

आणखी वाचा – पायलट भाचीकडून स्पेशल Announcement, पद्मश्री अशोक सराफ यांचे विमानप्रवासात कौतुक, म्हणाली, “आजचा प्रवास…”

View this post on Instagram

A post shared by Girish Pardesi (@girishpardesi)

अभिनेत्याने पुढे असेही सांगितले की, “माझ्या पत्नीने संबंधित महिलेला स्पष्ट सांगितले की जरी Gpay वर व्यवहार दिसतोय, पण खात्यात असे पैसे जमा झालेले नाहीत. तेव्हा त्या महिलेने प्रतिक्षा यांना खात्यात किती रक्कम आहे, असा सवाल केला. जेव्हा त्याच्या पत्नीने खात्यातील रक्कम सांगण्यास नकार दिला, तेव्हा त्या महिलेने फोन कट केला. यानंतर माझ्या पत्नीने त्या क्रमांकावर वारंवार कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण फोन कायम व्यग्र येत होता. पोलिसांकडे संपर्क साधल्यानंतर समजले की असे अनेक फ्रॉड सध्या घडत आहेत”.

आणखी वाचा – ज्येष्ठ अभिनेत्याच्या अश्लील मॅसेज प्रकरणी प्राची पिसाटचा युटर्न?, नेटकरीही संभ्रमात, म्हणाली, “चुकीचे…”

पुढे त्याने सतर्कतेचा इशारा देत म्हटलं की, “सतर्क राहा, आम्ही राहिलो म्हणून वाचलो! त्यांच्याकडे तुमच्या घरच्यांचे नंबर्स असतात आणि नंतर जेव्हा आम्ही त्यांना ब्लॉक केले तेव्हा तो सर्व डाटा आपोआप निघून गेला. ते पैसे परत पाठवायला खूप घाई करतात आणि तो परत नंबर लागत नाहीत कधीच. जास्तीत जास्त पसरवा”. गिरीशने हा व्हिडीओ शेअर करत दाखवलं की, फ्रॉड करणाऱ्यांकडून पैसे पाठवले जात नाहीतर तर स्प्लिट रिक्वेस्ट पाठवली जाते. आणि आपल्याला पैसे आल्याचा मॅसेज येतो मात्र खात्यात रक्कम जमा होत नाही. गिरीशने हा व्हिडीओ शेअर करत अशा भामट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

Tags: Fraud Alertonline fraudonline scam
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Vaishnavi hagawane death case

“संशय होता तर लग्न का केलं?”, वैष्णवी हगवणेवर केलेल्या आरोपांवर कस्पटे कुटुंबियांचा सवाल, पैशांसाठी लग्न करुन...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.