महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतलाय. या कार्यक्रमाचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. कित्यकेदा हा कार्यक्रम पाहिल्याशिवाय अनेकांच्या घशाखाली घास ही उतरत नाही. या शो मधील प्रत्येक कलाकार हे चर्चेत असतात. या कलाकारांचे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारताबाहेरही चाहतावर्ग आहे. (Sachin Goswami)
या शो चे कॅप्टन ऑफ द शिप तसेच सर्वस्व मानले जाणारे लेखक दिग्दर्शक सचिन गोस्वामीही प्रेक्षकांचे लाडके आहेत. बरेचदा ते कलाकारांकडून मेहनत करून घेताना दिसतात. त्यांच्यामुळेच या कार्यक्रमाची शोभा वाढलीय असं म्हणणं वावगं ठरणार नाही. सचिन गोस्वामी हे सोशल मीडियावर सक्रिय असून ते नेहमीच हास्यजत्रेचे BTS फोटो ,व्हिडीओ शेअर करत असतात.
पहा सचिन गोस्वामी यांची नवी पोस्ट (Sachin Goswami)
अशातच सचिन गोस्वामी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो पोस्ट करून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलय. सचिन गोस्वामी यांनी समीर चौघुले, प्रसाद खांडेकर सोबतचा फोटो शेअर करत सुत्तरफेणी+सुत्तरफेणी+सुत्तरफेणी.. असं कॅप्शन त्या फोटोला दिल आहे. समीर आणि प्रसादने त्यांच्या स्कीटदरम्यान केलेल्या गेटअप मध्ये त्यांनी पांढऱ्या रंगाचे केस लावले आहेत. तर या दोघांच्या मध्ये सचिन गोस्वामी यांनी उभा राहून काढलेला फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तिघांचेही केस पांढरे आहेत.
त्यांच्या या फोटोवर कमेंटचा वर्षाव होतोय. एका युजरने कमेंट करत लिहिलंय, शेवटी पांढरे केसाच्या राजकुमार आणि दोन पांढरे केसाची वजीर आपल्या राज दरबारात सामील केले???? तर एका चाहत्याने कमेंट करत लिहिलय Sir please add Sachin mote Sir also ,he is also sutarphenny असं म्हटलंय. या फोटोनंतर महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचे चाहते सचिन मोटेंना ही मिस करतायत.(Sachin Goswami)
हे देखील वाचा – गर्ल चिलींग इन समर… रिंकूचा समर लुक तुम्ही पाहिलात का ?
हास्यजत्रेतील प्रत्येक कलाकाराचा वेगळा चाहतावर्ग आहे. प्रत्येक कलाकार हा सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असतात. या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमासोबतच पोस्ट ऑफिस उघड आहे मालिकेची निर्मिती केली. या मालिकेत महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील कलाकारांचा अभिनय पाहायला मिळाला.