सोमवार, जून 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 30, 2026 | 5:08 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tumbadchi Manjula Makarand Anaspure

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

Tumbadchi Manjula Makarand Anaspure : ‘झी स्टुडिओज’च्या ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटाच्या टीझरनंतर चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटासह या चित्रपटातील अजून एका गोष्टीची चर्चा रंगली आहे. ती म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या खास विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे मकरंद अनासपुरे यांच्या भूमिकेची. लोकप्रिय अभिनेता मकरंद अनासपुरे पुन्हा एकदा नव्या आणि लक्षवेधी अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या चित्रपटात ते एका साधूच्या भूमिकेत झळकणार असून, त्यांच्या या लूकची सध्या जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. चित्रपटातील त्यांच्या गेटअपने पहिल्याच नजरेत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. लांब केस, दाट दाढी, कपाळावर ठसठशीत टिळा, गळ्यात माळा आणि अंगावर पारंपरिक वेशभूषा असा साधूचा अवतार या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

साधूची भूमिका असली तरीही त्यांच्या मिश्कीलपणाची व खुमासदार अंदाजाची झलक टीझरमध्ये दिसून येते. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांची सहजता आणि देहबोलीमुळे या व्यक्तिरेखेला एक वेगळाच रंग मिळाला आहे. मकरंद अनासपुरे यांनी यापूर्वीही विविध छटांतील भूमिका साकारल्या आहेत, मात्र साधूच्या गेटअपमध्ये त्यांचा हा विनोदी अंदाज प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. या कॉमेडी -हॉरर चित्रपटातील त्यांची भूमिका कथेला हलकेफुलके वळण देणारी ठरणार आहे.

आणखी वाचा – अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

आपल्या भूमिकेबद्दल मकरंद अनासपुरे म्हणतात, ‘’ ‘तुंबाडची मंजुळा’ करताना मला एक वेगळाच आणि समृद्ध अनुभव मिळाला. दिग्दर्शक विविध कोरगावकर हा नवीन असला, तरी त्याने हा चित्रपट अत्यंत संवेदनशीलतेने आणि प्रभावीपणे हाताळला आहे. या चित्रपटात मी आजवर कधीही न साकारलेली, थोडी वेगळी अशी ‘भोंदू महाराज’ ही भूमिका साकारली आहे, जी माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होती. या भूमिकेसाठीचा वेगळा लुक तयार करण्यासाठी मेकअपमॅन सचिन गिलबिले आणि कुंदन दिवेकर यांनी खूप मेहनत घेतली असून वेशभूषाकाराने दिलेल्या अनोख्या पेहरावामुळेही माझी भूमिका अधिक उठून दिसते. या लूकचं विशेष म्हणजे चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर माझ्या आईलासुद्धा साधूच्या भूमिकेत मीच आहे हे ओळखता आलं नाही. त्यामुळे हा लुक किती वेगळा आणि प्रभावी झाला आहे, याची मला जाणीव झाली. ही विनोदी भूमिका साकारण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तो प्रेक्षकांना कितपत भावतो, हे मात्र चित्रपट पाहिल्यानंतरच समजेल.’’

आणखी वाचा – हिजाब परिधान करणं सुप्रसिद्ध अभिनेत्रीला पडलं महागात, नेटकऱ्यांची नाराजी, म्हणाले, “मराठी असूनही…”

या चित्रपटात जितेंद्र जोशी, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे, योगेश शिरसाट, गणेश पंडित, सिद्धेश्वर झाडबुके, वर्षा दांदळे, शार्दुल सराफ, रीलस्टार अथर्व रुके, नवोदित अभिनेत्री प्रियल नाईक आणि उषा नाडकर्णी हे कलाकार आहेत. ऋषिकेश तुरई यांचे लेखन असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विविध कोरगांवकर या नव्या दमाच्या दिग्दर्शकाने केले आहे. झी स्टुडिओजतर्फे उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या ५ जून रोजी तो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Tags: Makarand Anaspuremarathi actorTumbadchi Manjula
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.