प्रेम म्हणल कि आपल्या आवडत्या व्यक्तीला हसताना पाहण्यासाठी आधी पत्रांचा वापर केला जायचा. नंतर थोडं धाडस वाढल्यानंतर थेट बोलून प्रेम व्यक्त केलं जाऊ लागलं आणि हे धाडस बऱ्यापैकी वाढवण्याचं काम केलं ते रुपेरी पडद्यावर झळकणाऱ्या चित्रपटांनी या चित्रपटांमध्ये मराठी, हिंदी अशा सर्व प्रकारच्या चित्रपटांचा समावेश होता.(Ashok saraf Nivedita Lovestory)
याच चित्रपटांच्या यादीतील एक चित्रपट म्हणजे शाहरुख खान आणि काजोलचा एक गाजलेला चित्रपट ‘दिलवाले दुलहनिया ले जायेंगे’ या सिनेमातील शाहरुख काजोलची जोडी ही आजही आयकॉनिक जोडी म्हणून ओळखली जाते. या चित्रपटातील गाण्यांपासून ते प्रत्येक सीन पर्यंत सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांनी उचलून धरल्या. पण या चित्रपटात जेव्हा सिमरन जात असते आणि शेवटी राज कडे पलटून पाहते हा सीन आधी मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध जोडी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या जोडीच्या प्रेमकहाणीमध्ये घडला होता. याबाबतची माहिती अशोक सराफ यांच्या बहुरूपी या आत्मचरित्रात देण्यात आली आहे.

मामांच्या अपघाताच्या बऱ्याच कालावधी नंतर ते एका गाण्याचं शूट करत असताना त्या सेटवर निवेदिता सराफ अशोक सराफ यांची खूप काळजी घ्यायच्या असं अशोक सराफ यांनी सांगितले पुढे ते म्हणाले की कोल्हापूरच्या एका शूट दरम्यान काम संपवुन निवेदिता सराफ मुंबईकडे जाणयासाठी निघणार होत्या पण अशोक सराफ तिथे थांबणार होते जाण्या आधी निवेदिता अशोक सराफ याना भेटीला आल्या दोघांमध्ये छान गप्पा झाल्या त्यावेळी मामांना माहिती होत कि निवेदिता यांचं त्यांच्यावर प्रेम आहे.(Ashok saraf Nivedita Lovestory)

राज सिमरनला ही टाकलं मागे(Ashok saraf Nivedita Lovestory)
गप्पा मारून झाल्यावर निघण्याची इच्छा नसतानाही निवेदीता जड पाउलांनी तिथून निघत होत्या त्यावेळी मामानी मनात हा विचार केला की दरवाज्यापर्यंत पोहचेपर्यंत ती एकदा तरी मागे वळून पाहणार आणि घडलं देखील तसंच निवेदिता जाता जाता पुन्हा एकदा मामांकडे बघून गेल्या. त्या प्रसंगावरून अशोक सराफ यांनी पुढे लिहिलं की पुढे काही वर्षांनी अगदी असाच सीन ‘दिलवाले दुलहनिया ले जायेंगे’ मध्ये पाहायला मिळाला.
अशोक सराफ आणि निवेदिता ही जोडी पुढे अनेक चित्रपटांमध्ये दिसली. अशी ही बनवाबनवी, धुमधडाका, दे दना दन अशा अनेक चित्रपटात या दोघांनी काम केलं आहे. अशोक मामांनी प्रेमाबद्दल सांगताना ते म्हणले की आमचं लग्न जुळवण्यात पुढाकार घेतलेला तो अभिनेते सचिन पिळगावकर यांनी. सध्या अशोक मामांना त्यांच्या सिनेप्रवासाबद्दल मानाचा जीवनगौरव पुरस्कार बहाल करण्यात आला. अशोक सराफ यांना या प्रवासात निवेदिता सराफ यांची खंबीर सात मिळाली असं म्हणायला हरकत नाही.