Rekha and Amitabh Bachchan : बॉलीवूडच्या इतिहासात सर्वात जास्त चर्चेत असलेले अफेअर हे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि सदाबहार अभिनेत्री रेखा यांचे मानले जाते. या दोन दिग्गजांनी ७० च्या दशकाच्या मध्यात एकमेकांना डेट करायला सुरुवात केली आणि ८० च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांचे नाते तुटले. रेखा आणि बिग बी यांच्या प्रेमकथा कुणापासून लपलेल्या नाहीत. त्यांच्या नात्याबाबत आतापर्यंत अनेक खुलासे झाले आहेत. एकेकाळी दिग्गज खलनायक रणजीतने रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित एक मोठे रहस्य उघड केले होते.
७० आणि ८० च्या दशकातील भयानक खलनायक असलेल्या रणजीतने रेखा आणि अमिताभ बच्चन या दोघांसोबत काम केले आहे. त्यांनी त्यांचे नाते जवळून पाहिले होते. अभिनय सोडल्यानंतर रणजीतने धर्मेंद्र, जया प्रदा आणि रेखा यांच्यासोबत दिग्दर्शक म्हणून ‘कारनामा’ चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला होता. तिघांचेही कास्टिंग झाले होते. पण, नंतर रेखाला या चित्रपटातून काढून टाकावे लागले. यामागचे कारण खूपच मनोरंजक आहे.
आणखी वाचा – हिजाब परिधान करणं सुप्रसिद्ध अभिनेत्रीला पडलं महागात, नेटकऱ्यांची नाराजी, म्हणाले, “मराठी असूनही…”
रेडिफला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत रणजीत म्हणाले होते, “चित्रपटाचे संपूर्ण पहिले शेड्यूल संध्याकाळच्या शिफ्टमध्ये निश्चित करण्यात आले होते. एके दिवशी रेखाने मला फोन केला आणि मला शुटिंग सकाळी शिफ्ट करता येईल का अशी विनंती केली कारण तिला संध्याकाळ अमिताभ बच्चनसोबत घालवायची होती. मी नम्रपणे नकार दिला, म्हणून तिने चित्रपट सोडला आणि साइनिंग रक्कमही परत केली”.
आणखी वाचा – सासूने नजर काढली आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने दाखविली जुळ्या मुलांची पहिली झलक, १० वर्षांनी झाली आई
रणजीतला एकापाठोपाठ दोन मोठे धक्के बसले होते. रेखानंतर धर्मेंद्रही या चित्रपटापासून दुरावले. कारण रेखाने चित्रपट सोडल्यानंतर त्यांचे शूटिंग लांबले आणि मग धर्मेंद्र दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त झाले. रणजीत म्हणाले होते, ‘शेवटी मी फराह, किमी काटकर आणि विनोद खन्नासोबत हा चित्रपट केला. हा चित्रपट १९९० मध्ये रिलीज झाला होता. रणजीतने नंतर ‘गजब तमाशा’ (1992) नावाचा चित्रपटही बनवला होता.




