खूपच कमी कालावधीत घरा घरात पोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. (Rinku Rajguru)
सैराट या चित्रपटातून रिंकूने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. आणि तिच्या या पहिल्याच चित्रपटाने तिला तुफान प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर तिने कन्नड मधेच सैराटचा रिमेक ही केला.
वेबसिरीज या माध्यमात ही तिने आपली छाप सोडली. हंड्रेड या हिंदी वेबसिरीज मधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. रिंकू तिच्या दिलखेचक अदांनी कायमच प्रेक्षकांना घायाळ करते.
रिंकू तिच्या सोशलमीडिया वर ही बरीच सक्रिय असते, तिच्या फोटोज, रील्स ला प्रेक्षकांन सोबत सेलिब्रिटीही भरभरून प्रतिसाद देतात. (Rinku Rajguru)
ट्रेडिशनल, बोल्ड , ग्लॅमर्स अशा वेगवेगळ्या पद्धतीचे फोटुशूट ती करत असते.नुकताच रिंकूने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून जस्ट, हॅशटॅग समर वाइब्स असे कॅप्शन देत एक फोटो शेअर केलाय.
त्यात तिने पर्पल रंगाचा शर्ट घातलेला आपल्याला दिसून येतोय त्यावर सनग्लासेस घालून तिचा हा समर लुक खूप कूल दिसतोय. तिच्या या पोस्ट वर सेलिब्रिटींसह तिच्या चाहत्यानीही कमेंट्स चा वर्षाव केलाय.
अभिनेत्री सायली संजीवने तिच्या या फोटो वर फायर ईमोजी टाकत कमेंट केली आहे. तिच्या डिसेन्ट तसे हटके पोज मध्ये ती फारच सुंदर दिसतेय.
सैराट च्या आधीची रिंकू आणि आता ची रिंकू यात आपल्याला खूप मोठे ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळते. रिंकू ही तिच्या अनेक इंटव्ह्यू मध्ये सांगते की, सैराट आधी तिला कोणी ओळखत नव्हते. आणि आता लोकांच्या रांगा असतात. सैराट नंतर रिंकूने कागर, आठवा रंग प्रेमाचा हे चित्रपट केले.अशाच वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मधून रिंकू तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडते.ती तिच्या प्रत्येक भूमिकेला न्याय देण्याचं पूर्ण प्रयत्न करते. आणि तिच्या या कामाची पावती प्रेक्षक त्यांच्या प्रतिक्रियांन मधून कायमच तिला देत असतात.