‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिका सुरु झाल्यापासून या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थान पटकावलं आहे. मालिकेच्या कथानकाने आणि मालिकेतील कलाकारांनी ही मालिका एका उंचीवर नेऊन ठेवली आहे. या मालिकेतील सायली अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. मालिकेत कायमच नवनवीन रंजक वळण आलेली पाहायला मिळतात. अर्जुन व सायली यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालेलं आहे. पुढील पाच महिन्यात त्यांचं हे कॉट्रॅक्ट संपणार आहे. असं असताना अर्जुन खरोखरचं सायलीच्या प्रेमात पडला आहे. (Tharla Tar Mag New Promo)
मालिकेच्या आजच्या भागात सायली व अर्जुन यांच्याही रोमँटिक क्षण पाहायला मिळणार आहेत. मात्र त्यांचे रोमँटिक क्षणचं त्यांच्या नात्याचं गुपित उघडकीस करण्यास भाग पाडणार आहेत. सायली व अर्जुन यांच्यातील बोलणं अर्जुनाची बहीण अस्मिताच्या कानावर पडतं. सायली कपडे मशिनला लावत असते तेव्हा नळाचा पाईप निघतो आणि पाणी उडत. बाथरूममध्ये सायली जोरात ओरडते. तेव्हा अर्जुन काय झालं ते पाहण्यासाठी येतो तेव्हा सगळं पाणी सायलीच्या अंगावर उडत असतं. नेमका नळ कुठून बंद करायचा हे तिला कळतंच नाही. त्यावेळी अर्जुन भान हरपून सायलीकडे एकटक पाहत राहतो. सायली हकमरुन अर्जुनचं हरपलेलं भान पुन्हा आणते. अर्जुन जेव्हा मदतीसाठी जातो, तेव्हा तो ही चिंब भिजतो. त्यावेळी त्यांच्यातील रोमँटिक क्षण पाहायला मिळतात.
त्यानंतर सायली बाहेर खोलीमध्ये जाते आणि कपडे बदलून झाले की त्याला हाक मारेल असं सांगते. ती जेव्हा बाहेर येते तेव्हा तिथे अस्मिता येऊन पोहोचते. त्यावेळी अर्जुनने मारलेली मिसेस सायली झालं का ही हाक ऐकून अस्मिता गोंधळात पडते. अर्जुन बाहेर आल्यानंतर अस्मिताला समोर पाहून तो बाजू सावरुन घेण्यासाठी प्रेमाचं नाटक करतो. आणि त्यांच्या रोमान्सची कहाणी अस्मिताला सांगतो. ते ऐकून तिला अवघडल्यासारखं होतं आणि ती निघून जाते. त्यानंतर दोघे दार लावून घेतात पण अस्मिता तिथून निघून गेलेली नसते. ती दाराला कान लावून अर्जुन-सायलीचं बोलणं ऐकते.
तेव्हा सायली अर्जुनला दटावत असते की अस्मिता ताईसमोर उगीच जे घडलं नाही त्याची वर्णनं का करत होतात, जे खरं घडलं ते सांगणं त्याने अपेक्षित होतं. ती विचारते की सगळ्यांना परिस्थिती खरी वाटावी म्हणून किती धडपडायंच? नेमकं हेच बोलणं अस्मिता ऐकते आणि ती विचार करू लागते की सायली असं नेमकं का म्हणाली असावी. त्यावेळीच अर्जुनला दिसतं की अस्मिता बाहेर उभी आहे. तो सायलीला हळू बोल म्हणून दटावतो.