लहान पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दलजित कौर ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत आली आहे. तिचा दूसरा पती निखिल पटेलबरोबर घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सर्वत्र होत आहेत. गेल्या वर्षी तिने निखिल पटेलबरोबर संसार थाटला. मात्र लग्नाला एक वर्ष पूर्ण होण्याआधीच दोघांमध्ये अंतर्गत मतभेद होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे लवकरच दोघंही घटस्फोट घेऊ शकतात अशी शक्यता आहे. (Dalljiet kaur on women empowerment)
दलजितने सह-अभिनेता शालीन भानोतबरोबर पाहिल्यांदा लग्नगांठ बांधली. दोघांना जेडेन नावाचा मुलगा आहे. मात्र लग्न झाल्यानंतर काही काळातच तिने शालीन विरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर तिने शालीनबरोबर घटस्फोट घेतला. त्यानंतर तिची ओळख निखिलबरोबर झाली. तो आधीच विवाहित होता आणि त्याला दोन मुली आहेत. निखिलबरोबर दूसरा विवाह केल्यानंतर तीन मुलांसह एकत्र राहू लागली. पण लवकरच त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. अशातच दलजितने महिला सशक्तीकरणावर भाष्य केले आहे.
नुकतीच दलजित FICCI फ्रेम्स इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी तिने माध्यमांशी संपर्क साधला. तेव्हा तिने महिला सशक्तीकरणावर भाष्य केले. ती म्हणाली की, “महिला सशक्तीकरण म्हणजे स्वतः निर्णय घेणे. पण असे करताना महिला खूप घाबरतात. पण आपण आता प्रगत झाले आहोत,पुढारलेले आहोत. पण अजूनही काही महिला निर्णय घेण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी घाबरतात. तो समाज असो वा ट्रॉलर्स असो सर्व ठिकाणी हे असतेच”.
पुढे दलजित म्हणते की, “एका महिलेच्या स्वरूपात मी स्वतः उभी आहे. मी एका आईच्या रुपात, एका अभिनेत्रीच्या रुपात आणि एका व्यवसायिकेच्या रुपात आपली जबाबदारी पार पाडत आहे. महिला ही खूप शक्तीशाली आहे. पण योग्य वेळी तिने उभे राहणे आणि पुढे जाणे महत्त्वाचे आहे”.
घटस्फोटाच्या चर्चांमध्ये आता दलजित व निखिल यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केले आहे. तसेच इन्स्टाग्रामवरील एकमेकांबरोबरचे फोटोही डिलिट केले आहेत. पण दलजितने आपल्या घटस्फोटाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.