प्रसिद्ध निर्माते संजय लीला भन्साळी यांची नवीन वेबसीरिज ‘हिरामंडी – द डायमंड बाजार’ सध्या खूप चर्चेत आहे. या वेबसीरिजमधील अनेक कलाकारांनी खूप कालावधीनंतर कमबॅक केले आहे. या कलाकारांमध्ये मनीषा कोइराला, शेखर सुमन, फरदीन खान या कलाकारांचा समावेश आहे. ही वेबसीरज 1 मे रोजी ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आली. या वेबसीरिजला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अनेक कलाकारांशी संवाद साधला गेला. याचवेळी शेखर सुमन यांनी त्यांच्या खासगी आयुष्यावरही भाष्य केले आहे. (shekhar suman on kangana ranaut)
शेखर यांनी खूप वर्षांनी मनोरंजन क्षेत्रात पुनरागमन केले आहे. या सीरिजमधील त्यांची भूमिका ही लक्षवेधी असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांचा मुलगा अध्ययनदेखील चित्रपटांमध्ये काम करताना दिसला होता. मात्र त्याला हवे तसे यश मिळू शकले नाही. यावरुन शेखर यांनी मुलांबद्दल व कंगनाच्या नात्याबद्दल विचारण्यात आले. त्यावरही त्यांनी दिलखुलासपणे भाष्य केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २००९ साली अध्ययनने त्याच्या वाढदिवसाला कंगनादेखील उपस्थित होती. त्यावेळी अध्ययनने तिच्यासाठी एक रोमॅंटिक गाणेदेखील गायले होते. या प्रसंगावरदेखील शेखर यांनी सांगितले. २००९ साली अध्ययनने त्याचा २२ वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी कंगना व अध्ययन याच्या ‘राज : द मिस्ट्री’ या चित्रपटातील ‘सोनियो’ हे गाणेदेखील खूप चर्चेत आले होते. तेच गाणे अध्ययनने कंगनासाठी देखील गायले होते. यासाठी शेखर यांनी त्यांच्या नात्याबद्दल सांगितले की, “प्रत्येकाला जीवनसाथी निवडण्याचा अधिकार आहे. अध्ययनने जरी जीवनसाथी निवडला तरीही मला कोणतीही समस्या नाही.जर तुम्ही याला प्रेमाचं नाव देत असाल तरीही चालेल”.
पुढे ते म्हणाले की, “मी त्याला बोललो की आताशी तू चालायला शिकला आहे. घुंगट उचलायला वेळ आहे. म्हणजेच की आता करिअरवर लक्ष दे. जर सात आठ वर्षांनीदेखील असेल प्रेम राहिलं तर तू लग्न कर. जर असे झाले तर आम्हाला आनंदच आहे”.
पण २०१६ साली अध्ययनने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्याने कंगना व त्याच्या ब्रेकअप बद्दल व्यक्त झाला होता. त्याने सांगितले होते की, “कंगनाने माझे भावनिक व शारीरिक शोषण केले होते. तिने माझ्यावर काळी जादू केली होती”. या नात्यातून बाहेर पडण्यासाठी खूप वेळ लागला होता. सध्या अध्ययन त्याच्या करिअरवर फोकस करत असल्याचेही शेखर यांनी सांगितले.