शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आदेश बांदेकरांच्या लेकाचं शिक्षण किती?, वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत मराठी इंडस्ट्रीत करत आहे काम, म्हणाला, “माझं शिक्षण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 6, 2024 | 10:30 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Soham Bandekar Education

आदेश बांदेकरांच्या लेकाचं शिक्षण किती?, वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत मराठी इंडस्ट्रीत करत आहे काम, म्हणाला, "माझं शिक्षण…"

कलाकार मंडळी जितके प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असतात तितकीच त्यांची मुलंही लोकप्रियता मिळवतात. कलाकारांच्या खऱ्या आयुष्याबद्दल त्यांच्या मुलांबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना विशेष आवडत. कलाकार मंडळीही त्यांच्या मुलांबद्दल खास अपडेट चाहत्यांसह शेअर करत असतात. तर बऱ्याच कलाकार मंडळींची मुलं आहेत जी आई-वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत सिनेसृष्टीत पदार्पण करतात. यांत एका कुटुंबाच नाव आवर्जून घेतलं जाईल ते म्हणजे बांदेकर कुटुंब. (Soham Bandekar Education)

१८ वर्षाहून अधिक काळ आदेश बांदेकर यांनी होम मिनिस्टर या कार्यक्रमातुन प्रेक्षकांची मन जिंकली. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा वेळ बाजूला काढत आणि गंमतीशीर खेळ खेळात समस्त महिला वर्गाच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचे काम आदेश बांदेकर करतात. महाराष्ट्राचे लाडके भावोजी अशी त्यांची संपूर्ण जगभरात ओळख आहे. या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. शिवाय अनेक कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनाची जबाबदारीही त्याने पेलवली आहे.

आणखी वाचा – “ट्रेनमधून उडी मारली आणि…”, लोकलने प्रवास करताना अंकिता लोखंडेचा झाला होता अपघात, अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, “मैत्रिणीने मला…”

आदेश बांदेकर यांचे संपूर्ण कुटुंब सिनेसृष्टीत सक्रिय आहे. त्यांची पत्नी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर या मराठी तसेच बॉलिवूडमध्येही विविध भूमिका साकारताना दिसतात. तर त्यांचा मुलगा सोहम बांदेकरने ही आई वडिलांपाठोपाठ अभिनयक्षेत्रात आपले नशीब आजमवण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय तो दिग्दर्शन देखील करत आहे. अनेक मराठी मालिकांमधून सोहमने महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.

आणखी वाचा – अशी आहे पुलकित सम्राट व क्रिती खरबंदा यांची लग्नपत्रिका, पण यामध्ये नेमकं खास आहे तरी काय?

सोहम सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. अनेकदा तो कुटुंबाबरोबर घालवतानाचा वेळ चाहत्यांसह शेअर करतो तर बरेचदा आपल्या व्यावसायिक आयुष्याची अपडेटदेखील तो देत असतो. नुकतेच त्याने आस्क मी क्वेक्शन हे सेशन इन्स्टाग्रामवर घेतले. यावेळी त्याने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे दिली. यावेळी एका चाहत्याने त्याला, “तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे?”, असा प्रश्न विचारला, यावर सोहमने उत्तर देत, “काय योग्य आणि काय चूक हे जाणून घेण्यासाठी पुरेसे पात्र असं माझं शिक्षण आहे. आणि मला आशा आहे की ते पुरेसे आहे”, असं म्हटलं आहे.

Tags: aadesh bandekar sonsoham bandekarSoham Bandekar Educationsoham bandekar instagram
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Next Post
Aamir Khan And Navneet Nishan Incident

…अन् आमिर खानला दिवसभर किस करत राहिली सुप्रसिद्ध अभिनेत्री, स्वतःच केला होता खुलासा, म्हणालेली, "अंडी फेकून मारहाण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.