रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अशी आहे पुलकित सम्राट व क्रिती खरबंदा यांची लग्नपत्रिका, पण यामध्ये नेमकं खास आहे तरी काय?

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 6, 2024 | 9:50 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Kriti Kharbanda pulkit samrat wedding

Kriti Kharbanda pulkit samrat wedding

सध्या सिनेसृष्टीमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. प्रथमेश परब, पूजा सावंत, तितीक्षा तावडे यांसारख्या मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधत चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्यांच्या लग्न सोहळ्याचे बरेच फोटो व व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. शिवाय अनंत अंबानी व राधिक मर्चंट यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना तर संपूर्ण बॉलिवूड लोटलं होतं. या लग्नाची क्रेझ अजूनही तशीच आहे. अशातच आता आणखी एक सेलिब्रिटी कपल विवाहबंधनात अडकणार आहे. हे जोडपं म्हणजे पुलकित सम्राट व क्रिती खरबंदा. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची बरीच चर्चा रंगली होती. आता पुलकित व क्रितीच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पुलकित व क्रितीच्या लग्नाची पत्रिका अगदी हटके आहे खास आहे. यामध्ये दोन व्यक्ती खुर्चीमध्ये बसल्या असल्याचं दिसत आहे. घरातीलच एखादा सीन असल्याचं या पत्रिकेमध्ये दिसत आहे. एका व्यक्तीच्या हातात गिटार आहे तर एक मुलगी तिथे शेजारीच बसलेली आहे. शिवाय पत्रिकेमध्ये श्वानही दिसत आहेत. “आपल्या लोकांबरोबर सेलिब्रेट करणं आता राहवत नाही” असं यामध्ये म्हटलं आहे. पण अद्यापही पुलकित व क्रितीने त्यांचीच ही पत्रिका असल्याचं सांगण्यास नकार दिला आहे.

आणखी वाचा : आजचे राशीभविष्य : ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार आर्थिक फायदा, तर नोकरीत मिळेल यश, जाणून घ्या राशीभविष्य

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

शिवाय या दोघांनी अजूनही त्यांच्या लग्नाची तारीख घोषित केली नाही. पण काही रिपोर्ट्सनुसार येत्या १३ मार्चला पुलकित व क्रिती विवाहबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वीच क्रितीने पुलकितबरोबरचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत मार्चमध्ये लग्न करणार असल्याचे तिने संकेत दिले होते. पण अधिकृरित्या दोघांनीही त्यांच्या लग्नाबाबत बोलणं टाळलं. मात्र चाहते पुलकित व क्रितीच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

आणखी वाचा – ओले काजूगर, शेती अन्…; बायको अंदमानमध्ये तर कोकणात आजोळी रमला प्रथमेश लघाटे, दाखवली गावाची संपूर्ण झलक

View this post on Instagram

A post shared by Pulkit Samrat (@pulkitsamrat)

‘पागलपंती’ या चित्रपटापासून पुलकित व क्रिती यांच्यामध्ये जवळीक आली. दोघांमधील मैत्रीचं रुपांतर प्रेमामध्ये झालं. मात्र सुरुवातीला कधीच त्यांनी उघडपणे त्यांच्या नात्याबाबत स्वीकार केला नाही. एका चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान क्रितीने तिच्या प्रेमाचा स्वीकार केला होता. शिवाय काही दिवसांपूर्वी दोघांच्या साखरपुड्याचे फोटोही व्हायरल झाले होते. ज्यामध्ये दोघंही अंगठी दाखवताना दिसले. आता पुलकित व क्रिती लग्न नक्की कधी करणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Tags: bollywood actorbollywood newsentertainment newsMarathi news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Soham Bandekar Education

आदेश बांदेकरांच्या लेकाचं शिक्षण किती?, वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत मराठी इंडस्ट्रीत करत आहे काम, म्हणाला, "माझं शिक्षण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.