बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : शेतात धमाल, गुरंढोरं अन्…; आजोळी पंढरपूरातील गावी जत्रेसाठी पोहोचली प्राजक्ता माळी, साधेपणाचं होत आहे कौतुक

Saurabh Moreby Saurabh More
मे 4, 2024 | 1:34 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prajakta Mali shared special video of her visit to her uncle's village see the details

Video : शेतात धमाल, गुरंढोरं अन्...; आजोळी पंढरपूरातील गावी जत्रेसाठी पोहोचली प्राजक्ता माळी, साधेपणाचं होत आहे कौतुक

छोट्या पडद्यावरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेद्वारे प्रेक्षकांशी रेशीमगाठ जुळवत त्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताने मराठी मालिका, चित्रपट यांसह अनेक कार्यक्रमांद्वारे सूत्रसंचालन करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आपल्या अभिनय व उत्तम सूत्रसंचालनाद्वारे चर्चेत असणारी अभिनेत्री तिच्या सोशल मीडियाद्वारे ही तितकीच चर्चेत राहत असते. सोशल मीडियाद्वारे प्राजक्ता नेहमीच तिचे हटके व स्टायलिश फोटो शेअर करत असते.

आपल्या मनमोहक सौंदर्याने व निरागस हास्याने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री नुकतीच तिच्या एका इन्स्टाग्राम व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री सध्या कामाच्या व्यस्ततेमधून वेळ काढत तिच्या मामाच्या गावाला गेली आहे. प्राजक्ता तिच्या मामाच्या गावी म्हणजेच पंढरपूरला गेली असून तिकडच्या कावड परंपरेत तिने सहभाग घेतला आहे. प्राजक्ताने तिच्या मामाच्या गावच्या कावड परंपरेचा एक खास व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्राजक्ताचे सगळे कुटुंबीय दिसत असून प्राजक्ता तिच्या लाडक्या भाचींसह एन्जॉय करतानाचेही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

आणखी वाचा – आकर्षक डिझाईन, सोन्याचा अधिकाधिक वापर अन्…; शरयू सोनावणेने डायमंडचा वापर न करता असं बनवून घेतलं मंगळसूत्र, डिझाईन आहे फारच खास

प्राजक्ताने पंढरपुरातील कावड प्रथेचा एक खास व्हिडीओ शेअर करत त्याखाली त्याविषयी माहितीही दिली आहे. यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, “२ मित्र मैत्रीत एकमेकांना वचन देतात, “आपण नाही राहिलो तरी जोवर चंद्र-सुर्य आहेत तोवर आपली मैत्रीची आठवण राहील. ही कावड चालू राहील. त्यांनी दिलेलं वचन हे गावकरी गेली ५-६ पिढ्या निगुतीनं पाळतायेत; ही कावड आजही चालू आहे आणि दोन समाजांमधील प्रेम अबाधित आहे. सगळी कामं बाजूला ठेवून सगळे कावडीला खांदा द्यायला सगळे धावून येतात”. प्राजक्ताने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिची कुटुंबियांबरोबरची धमाल मजामस्ती पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – “माझं ब्रेकअप झालं”, शाहरुख खानच्या लेकीने पोस्ट शेअर करत व्यक्त केलं दुःख, पोस्टवर बॉयफ्रेंडच्या आईनेही केली कमेंट

दरम्यान, तिने शेअर केलेल्या या व्हिडीओला तिच्या चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच गावच्या प्रथा-परंपरेत अभिनेत्रीने घेतलेल्या सहभागानिमित्त तिच्या अनेक चाहत्यांनी तिचे कौतुकही केले आहे. खूप छान, खूपच कमाल, मातीशी नाळ जोडून राहलेली कलाकार, आपल्या मातीशी नातं घट्ट करणाऱ्या काही गोष्टी तू अजूनही पाळतेस हे बघून खूपच छान वाटलं, पंढरपूरची नात” अशा अनेक कमेंट्स करत तिचे कौतुक केले आहे.  

Tags: marathi actressmarathi entertainment newsprajakta mali
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Next Post

Video : 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेचं शूट नक्की कसं होतं?, भर उन्हात कलाकार अशी घेतात मेहनत, पाहा Inside Video

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.