स्टार प्रवाह वहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सध्या चांगलीच गाजत आहे. गेल्या दोनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. तसेच अनेकदा या मालिकेने टीआरपीचे अनेक रेकॉर्डसही मोडले आहेत. मालिकेची कथा, कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय तसेच मालिकेतील अनेक नवनवीन ट्विस्ट यांमुळे मालिका चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडली. या मालिकेतील जयदीप-गौरी या दोन मुख्य कलाकारांसह सहकलाकारांवरदेखील चाहत्यांनी भरभरून प्रेम केले.
नुकताच या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आला तो म्हणजे मालिकेने २५ वर्षांची लिप घेतली. त्यामुळे या मालिकेतील काही जुन्या पात्रांची मालिकेतून एक्झिट झाली. यांमध्ये मालिकेत मल्हार या पात्राचीसुद्धा एक्झिट झाली. अभिनेता कपिल होनरावने मल्हार हे पात्र उत्तमरित्या साकारलं होतं. त्याची सहाय्यकाची भूमिका चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडली होती. त्यामुळे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधून कपिलची एक्झिट झाल्यापासून तो कोणत्या नवीन भूमिकेत झळकणार? याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिलं होतं.
हेही वाचा – उदय टीकेकर यांचा पत्नीबरोबर रोमॅंटिक फोटो, किसही केलं , म्हणाले, “बायको…”
अशातच मल्हार फेम अभिनेता कपिल होनरावने त्याच्या चाहत्यांना एक सुखद बातमी दिली आहे. कपिल हा लवकरच एका नवीन भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीला आला आहे. सोनी मराठी वाहिनीवर अलीकडेच सुरू झालेल्या एका नव्या मालिकेत तो झळकणार आहे. याचाच एक प्रोमो शेअर करत त्याने त्याच्या नवीन भूमिकेविषयी सर्वांना माहिती दिली आहे. अभिनेता कपिल होनराव ‘सोनी मराठी’ वाहिनीच्या ‘निवेदिता माझी ताई’ या मालिकेत दिसणार आहे. ही नवी मालिका १५ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. याच नव्या मालिकेतून कपिल नव्या भूमिकेत झळकणार आहे.
दरम्यान, ‘निवेदिता माझी ताई’ या नव्या मालिकेत अभिनेता अशोक फळदेसाई, अभिनेत्री एतशा संझगिरी आणि बालकलाकार रुद्रांश चोंडेकर प्रमुख भूमिकेत आहेत. तर अशोक ‘यशोधन’, एतशा ‘निवेदिता’ आणि रुद्रांश ‘असीम’च्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.