बुधवार, सप्टेंबर 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

…अन् मंचावर आईला पाहून ढसाढसा रडू लागली हेमांगी कवी, खास पोस्ट शेअर करत म्हणाली, “लोकांचे टोमणे, घरातल्यांची नाराजी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 12, 2024 | 3:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Hemangi Kavi Emotional

...अन् मंचावर आईला पाहून ढसाढसा रडू लागली हेमांगी कवी, खास पोस्ट शेअर करत म्हणाली, "लोकांचे टोमणे, घरातल्यांची नाराजी..."

स्पष्टपणे भाष्य करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत एका अभिनेत्रीचं नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे हेमांगी कवी . ट्रोलर्सच्या प्रश्नांना सडेतोडपणे उत्तर देत हेमांगी नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर हेमांगी बऱ्यापैकी सक्रिय असते. सोशल मीडियावर हेमांगीचा खूप मोठा चाहता वर्ग असलेला पाहायला मिळतो. तसेच ती नेहमीच रील-व्हिडीओ शेअर करताना दिसते. या रील व्हिडीओवरुन अनेकदा हेमांगीला ट्रोलही केलं गेलं आहे. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता ती वेळोवेळी नेटकरांच्या ट्रोलिंगला उत्तर देताना दिसली आहे. सध्या हेमांगी ‘मॅडनेस मचायेंगे’ या रियालिटी शोमध्ये धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहे. (Hemangi Kavi Emotional)

कुशल बद्रिके व हेमांगी कवीची जोडी या कार्यक्रमात पाहायला मिळत आहे. नुकताच ‘मॅडनेस मचायेंगे’ या मंचावर ‘मदर्स डे’ स्पेशल विशेष भाग साजरा करण्यात आला. यावेळी हेमांगीने नव्हेतर हेमांगीच्या आईने तिला मदर्स डे निमित्त खास सरप्राइज दिलेलं पाहायला मिळालं. आईने पाठवलेला हा खास व्हिडीओ पाहून हेमांगीला अश्रू अनावर झालेले पाहायला मिळतात. हेमांगीने हा व्हिडीओ शेअर करत खास कॅप्शन देत तिने तिच्या आईचे आभार व्यक्त केलेले पाहायला मिळत आहेत.

आणखी वाचा – पहिली भेट, कुटुंबियांकडून होकार अन्…; अशी सुरु झाली होती मृणाल दुसानिसची लव्हस्टोरी, पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली, “लग्नाआधी फक्त…”

View this post on Instagram

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

हा व्हिडीओ शेअर करत तिने असं म्हटलं आहे की, “प्रत्येक आईचं आपल्या मुलांवर प्रेम असतं. ते दाखवण्याच्या पद्धती वेगळ्या असतील पण मुल वाढवताना ती जे जे करते ते जगात कुणीच करु शकत नाही पण जेव्हा हिच मुलं मोठी होऊन अभिनय क्षेत्रासारखी जरा हटके वेगळी वाट निवडतात, तेव्हा त्या मुलांबरोबर त्या आईचा ही संघर्ष सुरु होतो. हा व्हिडीओ पाहताना माझ्या आईचा सगळा संघर्ष, तिचे कष्ट, तिने केलेला त्याग, लोकांचे सोसलेले टोमणे, घरातल्याच लोकांची पत्करलेली नाराजी, उघडउघड कधीच नाही पण नकळतपणे माझ्यात रूजवलेलं धैर्य, बळ आणि आज माझ्याबद्दल बोलताना तिचा भरुन आलेला ऊर पाहून अत्यानंद झाला आणि माझा बांध फुटला. (Screen वर दिसणारं सगळंच scripted नसतं)”.

आणखी वाचा – जंगल सफारी, बोटिंगही केली अन्…; मुग्धा वैशंपायनने लग्नानंतरचा वाढदिवस ‘या’ ठिकाणी केला साजरा, नवऱ्याने दिलं खास सरप्राइज

पुढे तिने लिहिलं आहे की, “Mother’s Day निमित्ताने आज मी तिला सरप्राइज, भेटवस्तू द्यायला हवी होती पण तिनेच ‘मॅडनेस मचायेंगे’च्या ‘Mother’s Day special’ episode मध्ये हा व्हिडीओ पाठवून मला हे सरप्राइज आणि गोड गिफ्ट दिलं. एवढ्या मोठ्या मंचावर पहिल्यांदा माझी मम्मी दिसणार”.

Tags: hemangi kaviHemangi Kavi Emotionalhemangi kavi mothermarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Mrunal Dusanis Comeback

चार वर्षांनंतर मृणाल दुसानिसचं मालिकाविश्वात कमबॅक, पहिल्यांदाच स्वतः केला खुलासा, म्हणाली, "कामाला सुरुवात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.