रविवार, जुलै 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

चार वर्षांनंतर मृणाल दुसानिसचं मालिकाविश्वात कमबॅक, पहिल्यांदाच स्वतः केला खुलासा, म्हणाली, “कामाला सुरुवात…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 12, 2024 | 5:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Mrunal Dusanis Comeback

चार वर्षांनंतर मृणाल दुसानिसचं मालिकाविश्वात कमबॅक, पहिल्यांदाच स्वतः केला खुलासा, म्हणाली, "कामाला सुरुवात…"

अभिनेत्री मृणाल हिने मराठी मालिका विश्वात आपल्या अभिनय कौशल्याने स्वतःचं असं स्थान निर्माण केलं. अनेक मराठी मालिकांमधून मृणालने रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मृणाल ही मराठी विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्रींच्या यादीतील एक आहे. मात्र चार वर्षांपासून मृणाल मालिका विश्वात कुठेही दिसली नाही. लग्नानंतर मृणालने मालिका विश्वातून ब्रेक घेतलेला पाहायला मिळाला. मृणालनं नीरजसह लग्नगाठ बांधल्यानंतर ती कायमची अमेरिकेत स्थायिक झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे मृणालला भारतातील प्रेक्षक खूप मिस करताना दिसले. (Mrunal Dusanis Comeback)

मृणालने पुन्हा मालिकविश्वात यावं अशी अपेक्षाही तिच्या चाहत्यांनी वेळोवेळी कमेंट्सद्वारे केलेली पाहायला मिळाली. आता या प्रेक्षकांच्या इच्छेखातर मृणाल पुन्हा एकदा भारतात परतली असल्याचे पाहायला मिळते. मृणाल चार वर्षानंतर पुन्हा भारतात परतली असून ती आता मालिकाविश्वात पुन्हा काम करण्यास सज्ज होणार असल्याचा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान केला. मृणालने नुकतीच ‘मज्जा पिंक’ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. मदर्स डे स्पेशल दिलेल्या मुलाखतीत मृणाल व तिची लेक नूरवी हिचा गोड अंदाज पाहायला मिळाला. मृणाल आता सहकुटुंब भारतात परतली असून लवकरच ती कामाला सुरुवात करणार असल्याचा खुलासा तिने केला आहे.

आणखी वाचा – शिवाली परबच्या नव्या घराबाहेरील आकर्षक नेमप्लेटने वेधलं लक्ष, सहकुटुंब गृहप्रवेश करतानाचा व्हिडीओ समोर, म्हणाली, “इतकी वर्ष भाड्याच्या घरात…”

यावेळी बोलताना मृणाल म्हणाली, “मला टेलिव्हिजन करायला आवडेल. मी चांगल्या कामाची वाट बघतेय. मी टेलिव्हिजन नक्कीच करणार आहे. आणि नंतर चित्रपट, नाटक या गोष्टी हळूहळू वेळेनुसार सुरु करणार आहे. नाही म्हटलं तरी चार वर्षांचा गॅप झाला आहे. त्यामुळे आता मी लवकरच कामाला सुरुवात करणार आहे. आणि नुरवी आता दोन वर्षांची झाली आहे. तिला बऱ्यापैकी समज आली आहे. मी सव्वा महिन्याची असताना माझ्या आईने कामाला सुरुवात केली. आता मलाही असं वाटतंय की मी कामाला सुरुवात करु शकेन. आणि इकडे माझं कुटुंब, पालक आहेत जे तिच्याकडे लक्ष ठेवू शकतील. काम करणार हे नक्की”.

आणखी वाचा – …अन् मंचावर आईला पाहून ढसाढसा रडू लागली हेमांगी कवी, खास पोस्ट शेअर करत म्हणाली, “लोकांचे टोमणे, घरातल्यांची नाराजी…”

आता मृणाल नक्की कोणत्या वाहिनीवर दिसणार. कोणत्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. मृणालचा हा कमबॅक पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.

Tags: entertainmentmarathi actressmarathi serialmrunal dusanisMrunal Dusanis Comeback
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
13 may 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

मेष व कर्क राशीच्या लोकांना नशीब उत्तम साथ देईल, धनलाभाचाही आहे योग; कुणाचं नशीब उजळणार?, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.