बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मेष व कर्क राशीच्या लोकांना नशीब उत्तम साथ देईल, धनलाभाचाही आहे योग; कुणाचं नशीब उजळणार?, जाणून घ्या…

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 12, 2024 | 8:00 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
13 may 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

मेष व कर्क राशीच्या लोकांना नशीब उत्तम साथ देईल, धनलाभाचाही आहे योग; कुणाचं नशीब उजळणार?, जाणून घ्या...

मेष : नोकरीत अपेक्षेप्रमाणे बढती व बदली होण्याचे योग आहेत. व्यापारात स्पर्धकांच्या चुकीचा नकळत फायदा होईल. त्यामुळे व्यापारात वाढ होईल. महत्वपूर्ण व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. शासकीय योजनेतून लाभ घडेल. कौटुंबिक सौख्य राहील. आरोग्य उत्तम राहणार आहे. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे.

वृषभ : आर्थिक खर्चाचा ताळमेळ ठेवा. नोकरीत तणाव मुक्त झाल्याने मन समाधानी राहील. शासकीय सेवेतील व्यक्तींनी सरळमार्गी मिळणाऱ्या पैशाला महत्व द्यावे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांची आरोग्याची तक्रार निर्माण होईल. वैवाहिक जीवनात क्षमाशील राहणे सर्वोत्तम ठरेल. आज प्रवास सुखकर होईल. प्रवासातून लाभ होईल. संततीबद्दल समाधान व्यक्त कराल.

मिथुन : मनाची चलबिचल वाढेल. व्यापारात देण्या-घेण्याच्या व्यवहारात सावध राहा. कुटुंबातील सदस्यांसोबत वादविदाचे प्रसंग टाळा. संततीकडे विशेष लक्ष द्यावे. मुलांच्या कामावर नजर ठेवा. कलाक्षेत्रात केलेल्या कामाचे चीज होणार नाही. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष केल्याना मोठ्या समस्या उद्भवतील. शत्रुपक्ष वरचढ होतील.

कर्क : कामाच्या पद्धतीत बदल केला तर फायदेशीर ठरणार आहे. व्यापारात आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. कार्यक्षेत्रात विस्तार वाढ होईल. उधारी वसुली मनासारखी होईल. नव्या संधीचा फायदा होईल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. प्रेमप्रकरणातील संबंध दृढ होतील. पत्नीकडून सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंदमय राहील.

सिंह : हितशत्रुचा त्रास जाणवेल. आपल्या विरोधात वातावरण तयार होऊ नये याची काळजी घ्या. व्यापारात आर्थिक समस्या येऊ शकतात. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. स्थावर मालमत्तेबाबत अडचण येण्याची शक्यता आहे. संततीच्या आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक प्रतिष्ठीत व्यक्ती किंवा राजकीय नेत्यांच्या गाठीभेती होतील. त्यातून आकस्मिक लाभाची शक्यता आहे.

कन्या : आपल्या कामात बुद्धी चातुर्याचा उपयोग केल्यास फायदा होईल. मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. मुलाची प्रगती आपल्याला आनंद देईल. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. वैवाहिक जीवनातले भांडण मतभेद दूर होऊ शकतील. परदेश भ्रमणाचा योग आहे. आरोग्य उत्तम राहील. दूरच्या प्रवासातून लाभ होतील. व्यसनापासून दूर रहा. दुरवरचे प्रवास घडतील.

तुळ : व्यापारिक प्रकरणात जवाबदारी वाढणार आहे. आपसातील वाढ समजदारीने मिटवा. प्रापर्टी खरेदीचा योग आहे. आर्थिक बाबतीत मध्यम स्वरुपाचा दिवस आहे. भावडांशी वादविवाद टाळा. विद्यार्थ्यानी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. सामाजिक कार्यक्रम साहित्यिक चळवळ व्यासपीठ इत्यादी माध्यमातून आपला नावलौकिकेत वाढ होईल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात आनंदी राहाल.

वृश्चिक : प्रतिष्ठित व्यक्तींच्या संबंधाचा फायदा उचला. व्यापारात यश मिळणार आहे. आर्थिक स्थिती संतोषजनक राहील. भाऊबहिणीकडून आर्थिक सहकार्य मिळू शकते. मितभाषी राहिल्याने आर्थिक फायदा होईल. व्यापारात नवीन प्रस्ताव मिळतील. प्रिय व्यक्तींची भेट होण्याचे योग आहेत. आपल्या पराक्रमामुळे समाजात व कुटुंबात आपली प्रतिष्ठा वाढणार आहे. लाभदायक दिवस आहे. मोठी गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे.

धनु : नोकरीत बदलाचे निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांकडून कामाचा दबाब राहील. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकार आणि मोठेपणामुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. प्रत्येक व्यवहार काळजीपूर्वक करा अन्यथा मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. कायदेशीर पेचप्रसंगात अडकले जाण्याची शक्यता आहे.

मकर : घरासंबंधी समस्या सुटतील. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. मागील कामात विशेष यश मिळेल. मनोधैर्य वाढेल. वैवाहिक जीवन व कंटुबातील स्थिती चांगली राहील. आपल्या महत्वकांक्षेनुसार सर्व कामे पार पडतील. उताविळपणा करू नये. संयम ठेवून वाटचाल करावी. सकारात्मक विचार ठेवा.

कुंभ : व्यापार रोजगारात नवीन संधी येऊ शकते. यश व उत्साह वाढणार आहेसंकुचित मनोवृत्ती टाळा. विद्यार्थीवर्गाची विद्याभ्यासात प्रगती होईल. कुटुंबातील वातावरण स्नेहपूर्वक राहील. आपल्या व्यसनांवर आवर घाला. कुटंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. प्रवास लाभकारी ठरतील. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.

मीन : व्यापारात नवीन योजनेवर विचार कराल. घरासंबंधी समस्या सुटतील. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. मागील कामात विशेष यश मिळेल. मनोधैर्य वाढेल. वैवाहिक जीवन व कंटुबातील स्थिती चांगली राहील. आपल्या इच्छा महत्वकांक्षेनुसार सर्व कामे पार पडतील. उताविळपणा टाळा. व्यावसायिक यश मिळाल्याने आनंदी राहाल.

Tags: Horoscope Marathi NewsToday's Horoscope Marathi NewsToday's Horoscope News
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Satish Joshi Passed Away

ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन; व्यासपीठावरच घेतला अखेरचा श्वास

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.