Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’चा अंतिम सोहळा अगदी एका दिवसाच्या अंतरावर आला आहे. २८ जानेवारी रोजी होणाऱ्या या अंतिम सोहळ्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच ‘बिग बॉस १७’ च्या निर्मात्यांनी विजेत्याच्या प्रतीक्षेत असलेल्या ट्रॉफीचा फर्स्ट लूक समोर आणला आहे. ‘बिग बॉस’ने एक नवीन प्रोमो जारी केला ज्यामध्ये चमकदार अशी लक्षवेधी ‘बिग बॉस १७’ची ट्रॉफीची झलक पाहायला मिळाली. या ट्रॉफीसाठी पाच फायनालिस्ट अंकिता लोखंडे, मुन्नवर फारुकी, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा व अरुण माशेट्टी यांची ट्रॉफीसाठी खडतर स्पर्धा पाहायला मिळत आहे.
‘बिग बॉस १७’ ची ट्रॉफी पूर्णपणे ‘दिल दिमाग, दम’ या शोच्या थीमची लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. या शोमधील तीन खोल्या व ‘बिग बॉस’च्या घराचे सार ट्रॉफीमध्ये पाहायला मिळत आहे. या ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर आता कोणता स्पर्धक नाव लिहिणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.
???? BREAKING! Bigg Boss 17 TROPHY FIRST LOOK
— #BiggBoss_Tak???? (@BiggBoss_Tak) January 26, 2024
Rate on a scale of 1 to 5. pic.twitter.com/l3zKnhasnb
‘बिग बॉस १७’ च्या या पर्वात बक्षीस म्हणून ३० ते ४० लाख रुपयांच्या दरम्यानची रक्कम असण्याची शक्यता आहे. याशिवाय विजेत्याला एक कार देखील मिळणार आहे. उद्या रात्री म्हणजेच २८ जानेवारी रोजी अंतिम सोहळ्याच्या रात्री विजेत्याचे नाव घोषित केले जाईल. जुन्या स्पर्धकांचे डान्सही यावेळी पाहायला मिळणार आहेत ज्याची झलक प्रोमोमध्ये समोर आली आहे.
आणखी वाचा – उदय टीकेकर यांचा पत्नीबरोबर रोमॅंटिक फोटो, किसही केलं , म्हणाले, “बायको…”
‘बिग बॉस’च्या आजच्या भागात इंडस्ट्रीतील काही खास पाहुणे स्पर्धकांना पाठिंबा देण्यासाठी शोमध्ये आलेले पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे हा भाग खूपच भावूक झालेला पाहायला मिळणार आहे. याचा प्रोमो समोर आलेला पाहायला मिळाला आहे. ज्यामध्ये मुन्नवर फारुकी, अंकिता लोखंडे यांना करण कुंद्रा व अमृता खानविलकर पाठिंबा देण्यासाठी आले होते. दोघांना पाहून स्पर्धक भावूक झाले होते.