‘बिग बॉस १७’च्या पर्वाचा महाअंतिम सोहळा बघता बघता अगदी उद्यावर येऊन ठेपला आहे. ‘बिग बॉस’च्या यंदाच्या पर्वाने प्रेक्षकांचे अगदी भरभरून मनोरंजन केले. यंदाच्या पर्वात भांडणे, मारामारी, रुसवे-फुगवे, आरोप-प्रत्यारोप यांसह सलमान खानचा ओरडा, शिक्षा हे सगळं काही प्रेक्षकांनी बघितलं. ‘बिग बॉस’चे यंदाचे पर्व हे मनोरंजन विश्वातील जोड्यांवर आधारित होतं. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या यंदाच्या १७व्या पर्वात अनेक जोडप्यांनी सहभाग घेतला होता. ५त्यामुळे या जोडप्यांमधील रोजच्या भांडणांचादेखील प्रेक्षकांनी अगदी मनमुराद आनंद घेतला. (Prarthana Behere Give Support to Ankita Lokhande)
अशातच ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा उद्यावर आला आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकण्यासाठी घरातील प्रत्येक स्पर्धकाचा चाहता वा प्रेक्षक आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकण्यासाठी पाठिंबा देत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात सामान्य प्रेक्षकांसह कलाकार मंडळीदेखील त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी समर्थन देत आहेत.

अंकिता लोखंडे ही या घरातील मुख्य आकर्षण बनली आहे. घरात आल्याच्या पहिल्या दिवसापासूनच ही अभिनेत्री विविध कारणांनी चर्चेत आहे. अंकिताची या शोमध्ये येण्याआधीच ती ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचली होती. या मालिकेमुळे तिला अमाप लोकप्रियता मिळाली होती हे तर जगजाहीर आहेच आणि या शोमुळे ती आणखीनच लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे अनेक स्तरातून तिला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे.
अशातच मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने अंकिता लोखंडेला तिचा पाठिंबा दर्शवला आहे. प्रार्थनाने तिच्या सोशल मीडियावर अंकितासाठी खास पोस्ट शेअर करत पाठिंबा दिला आहे. प्रार्थनाने अंकिता लोखंडेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्या व्हिडीओखाली तिला ‘मत द्या’ असं म्हटलं आहे. त्याचबरोबर अंकिताला उद्याच्या महाअंतिम सोहळ्यासाठी शुभेच्छादेखील दिल्या आहेत.
दरम्यान, प्रार्थना व अंकिता या खूप जुन्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे अंकिताला ‘बिग बॉस’च्या शोची विजेती करण्यासाठी तिच्या जुन्या मैत्रिणीने पाठिंबा दिला आहे. याआधी अंकिताला रश्मी देसाई, राखी सावंत, कंगना रानौत, सनी लिओनी या बॉलिवूड अभिनेत्रींसह अमृता खानविलकर, अभिज्ञा भावे आणि आता प्रार्थना बेहेरे हिनेदेखील अंकिताला पाठिंबा दिला आहे