छोट्या पडद्यावरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांची आवडती मालिका होत चालली आहे. रहस्यमय कथानकामुळे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. तसेच या मालिकेत एकामागून एक येणारे ट्विस्टस या मालिकेची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण होत आहेत. अशातच आता मालिकेत आणखी एक वळण आल्याचे पाहायला मिळत आहे. नुकताच मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला असून यामुळे चाहत्यांची अपेक्षा वाढली आहे. (Satvya Mulichi Satavi Mulgi New Promo)
झी मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमुळे मालिकेत येणाऱ्या नवीन ट्विस्टची झलक पाहायला मिळत आहे. या नवीन प्रोमोमध्ये इंद्राणी असे म्हणते की, “या विरोचकापासून फक्त अद्वैतला नाही तर सर्वांनाच धोका आहे.” यानंतर नेत्रा असे म्हणते की, “हे सगळं खूप भीतीदायक होत चाललं आहे. त्या (रुपाली) म्हणाल्या होत्या की मृत्यूचं तांडव सुरू होणार आहे.” नेत्रा-इंद्राणी यांच्या या संवादावरून मालिकेत नवीन ट्विस्ट येणार असल्याचे दिसत आहे.
तसेच या प्रोमोमध्ये पुढे रुपाली (अद्वैतची आई) अद्वैतला कपातून चहा देते. हा चहा पिताच अद्वैतच्या तोंडातून फेस येऊ लागतो आणि तो जमिनीवर कोसळतो. यानंतर रुपाली त्याच्या छातीवर पाय ठेवत “खऱ्या अर्थाने या विरोचकाचा बदला पूर्ण झाला आहे. हा विरोचक कुणालाही सोडणार नाही” असं म्हणते आणि तिथून निघून जाते. ती निघून जाताच अद्वैत उठतो आणि आईकडे संशयाने पाहू लागतो.
आणखी वाचा – आकर्षक साडी, सुंदर सजावट अन्… ; मुग्धा वैशंपायनच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, पाहा खास फोटो
दरम्यान, या नवीन प्रोमोमुळे अद्वैतला रुपालीचं सत्य कळणार असल्याचे दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर हा प्रोमो व्हायरल होत असून या प्रोमोखाली चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. “अद्वैतला सत्य कळलं तर बरं होईल, कृपया हे स्वप्न नको असुदेत, आम्ही याची आतुरतेने वाट पाहत आहोत, शेवटी अद्वैतला कळलंच,” असं म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे मालिकेच्या आगामी भागासाठी चाहते भलतेच उत्सुक आहेत.