मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय व प्रसिद्ध अभिनेते म्हणजे पंकज त्रिपाठी. अभिनयातील सहजतेमुळे त्यांनी अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आजवर त्यांनी अनेक चित्रपट व वेबसिरीजमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. विनोदी, खलनायकांसह अनेक नानाविध भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांमध्ये त्यांच्या अभिनयाची छाप सोडली आहे. अशातच आता ते पुन्हा एकदा एका नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. (Main Atal Hoon Trailer)
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जीवनपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या जीवनपटाचे नाव “मैं अटल हूँ” असं असून या चित्रपटात पंकज त्रिपाठी हे अटल बिहारी वाजपेयी यांची प्रमुख भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. अशातच आता या चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमधील पंकज त्रिपाठी यांच्या संवादांनी व अभिनयाने साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे. अनेकजण ट्रेलरच्या या व्हिडीओखाली कमेंट्सद्वारे त्यांच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत.
आणखी वाचा – आकर्षक साडी, सुंदर सजावट अन्… ; मुग्धा वैशंपायनच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, पाहा खास फोटो
नुकताच मुंबईत या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्याला पंकज त्रिपाठी, दिग्दर्शक रवी जाधव, निर्माते विनोद भानुशाली व संदीप सिंगपंकज यांसह चित्रपटाची बाकी टीमही उपस्थित होती. यावेळी पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या भावना व्यक्त करत असे म्हटले की, “अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणे माझ्यासाठी सोपे काम नव्हते. कारण अटलजींची भूमिका साकारताना मला मिमिक्री करायची नव्हती.”
आणखी वाचा – Video : “माझ्या आईनेच दुसरा ‘शोले’ बनवला”, क्रांती रेडकरच्या आईचा मजेशीर व्हिडीओ, तुम्हीही पोट धरुन हसाल
दरम्यान, ‘मैं अटल हूँ’ या चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरा मराठमोळे दिग्दर्शक रवी जाधव यांनी सांभाळली आहे. तर ऋषी विरमानी व रवी जाधव यांनी चित्रपटाचे कथानक लिहिलं आहे. भानुशाली स्टुडिओ लिमिटेड व लीजेंड स्टुडिओच्या बॅनर अंतर्गत विनोद भानुशाली, संदीप सिंह व कमलेश भानुशाली यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या १९ जानेवारीपासून हा चित्रपट देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सगळेच या चित्रपटासाठी उत्सुक आहेत.