शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आकर्षक साडी, सुंदर सजावट अन्… ; मुग्धा वैशंपायनच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, पाहा खास फोटो

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 21, 2023 | 9:53 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
saregamapa fame marathi singer mugdha vaishampayan hared her grahmakh photo on social media

आकर्षक साडी, सुंदर सजावट अन्… ; मुग्धा वैशंपायनच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, पाहा खास फोटो

छोट्या पडद्यावरील ‘सारगेमप लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेले गायक-गायिका म्हणजे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे. सध्या मनोरंजन सृष्टीत लग्नाचे वारे वाहत आहेत. अशातच मुग्धा-प्रथमेश यांच्या लग्नाच्या तयारीलादेखील सुरुवात झाली आहे. गेले काही दिवस यांच्या लग्नाच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगत होत्या. मात्र आता ही जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार असून त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. काल (बुधवार) नुकताच यांचा हळदी सोहळा करण्यात आला. अशातच आता त्यांच्या ग्रहमख सोहळ्याचे काही फोटोसुद्धा समोर आले आहेत. (Mugdha Vaishampayan On Instagram)

एखाद्या मंगल कार्यासाठी नवग्रहांची अनुकूलता मिळवण्यासाठी ग्रहमख हा विधी करण्याची पद्धत असते. या ग्रहमख सोहळ्यासाठी मुग्धाने खास निळ्या रंगाची पैठणी साडी नेसली होती. लग्नाच्या एक किंवा दोन दिवस आधी हा विधी घरच्या घरी करण्यात येतो. याचे काही खास फोटो मुग्धाने इन्स्टाग्रामद्वारे शेअर केले आहेत. गायिकेच्या घरी लग्नानिमित्त फुलांची सुंदर अशी सजावट व आकर्षक रोषणाईदेखील करण्यात आल्याचं या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Mugdha Bhagawan Vaishampayan (@mugdhabhagawan5)

आणखी वाचा – Video : “माझ्या आईनेच दुसरा ‘शोले’ बनवला”, क्रांती रेडकरच्या आईचा मजेशीर व्हिडीओ, तुम्हीही पोट धरुन हसाल

मुग्धाने शेअर केलेल्या या खास फोटोंमध्ये ती भलतीच आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या या फोटोंना नेटकऱ्यांनीदेखील लाईक्स व कमेंट्स करत उत्तम प्रतिसाद दिला आहे. तिच्या अनेक चाहत्यांनी या फोटोवर ‘याला म्हणतात अस्सल मराठमोळे लग्न, मुग्धा किती गोड दिसत आहेस, सुंदर, खूपच छान” अशा अनेक कमेंट्स करत तिचं कौतुक केले आहे. तसेच तिला व प्रथमेशला लग्नानिमित्त शुभेच्छादेखील दिल्या आहेत.

आणखी वाचा – Video : साड्या खरेदी करत आहे शिवानी सुर्वे, अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चांना उधाण, बॉयफ्रेंड कमेंट करत म्हणाला…

दरम्यान, मुग्धा-प्रथमेश ही जोडी ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या शोमुळे एकत्र आली. या शोमुळे त्यांच्यात ओळख झाली. पुढे त्यांच्या दोघांचे एकत्र गाण्याचे कार्यक्रम सुरू झाले आणि हे एकत्र कार्यक्रम करत असताना दोघांच्याही मनात एकमेकांविषयी प्रेमाची भावना निर्माण झाली. मग एके दिवशी त्यांनी सोशल मीडियावर ‘आमचं ठरलंय’ असं म्हणत एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिली होती आणि आता अखेरीस ही जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

Tags: entertainmententertainment newsMarathi newsmugdha prathameshmugdha vaishampayan and prathamesh laghateprathamesh laghate
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate

प्रथमेश लघाटेच्याही घरी लग्नाची जोरदार तयारी, ग्रहमख व्हिडीओचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.