बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आमच्या हमरेको तुमरेकोमुळे समाज हिंदी…”, हिंदी भाषेच्या सक्तीवर समीर चौघुलेंची पोस्ट, म्हणाले, “समाजात जे दिसतं…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 21, 2025 | 1:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Samir Choughule on maharashtra school hindi third language controversy

“आमच्या हमरेको तुमरेकोमुळे समाज हिंदी...”, हिंदी भाषेच्या सक्तीवर समीर चौघुलेंची पोस्ट, म्हणाले, “समाजात जे दिसतं...”

राज्यात सध्या हिंदी भाषेचा मुद्दा वादाचा ठरत आहे. राज्य मंडळाच्या मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी ही तिसकी भाषा म्हणून शिकवावी असे आदेश आले आहेत. यावरुनच राजकीय वर्तुळासह कलाक्षेत्रातही विविध चर्चा, वाद सुरु आहेत. प्रत्येकजण याबाबत आपलं मत मांडत आहे. पहिल्या वर्गापासून हिंदी भाषेची सक्ती नाही. पण पाचवीपर्यंत हिंदी तिसरी भाष शिकवणं बंधनकारक यंत हिंदी तिसरी भाष शिकवणं बंननझालं आहे. आता याबाबत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौघुले यांनीही त्यांचं मत मांडलं आहे. (Samir Choughule on maharashtra school hindi third language controversy)

समीर यांनी फेसबुकद्वारे एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी म्हटलं की, “आम्ही मराठी बोलतो. जसं जमेल तसं तोडकं मोडकं हिंदी बोलतो. तेवढं जगायला पुरेसं आहे. एवढ्या नाजूक आणि लहान वयात मुलांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हिंदी किंवा तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच. आम्ही कार्यक्रमात हमरेको तुमरेको करतो त्या भाषेत ही ९० टक्के मराठीच असतं. कारण आपण ९० टक्के मराठी माणसे याच प्रकारे हिंदीत व्यक्त होतो”.

आणखी वाचा – प्रार्थना बेहेरेच्या पायाला दुखापत, गुडघ्याची मोठी शस्त्रक्रिया, म्हणाली, “काही आठवडे तरी…”

“ते फक्त आणि फक्त विनोदापुरतं असतं. त्यामुळे आम्हाला आमच्याच कामाचे दाखले कृपया देऊ नका. जे समाजात दिसतं ते आम्ही दाखवतो.  आमच्या “हमरेको तुमरेको”मुळे समाज अचानक हिंदी बोलायला लागला नाही. आम्हालाही हिंदी चित्रपट, हिंदी गाणी, साहित्य आवडतं. आम्हाला हिंदीचा अजिबात राग नाही”.  

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक मृत्यू, घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, शेजाऱ्यांना वास आला तेव्हा…

“पण आम्ही सर्व ठिकाणी हट्टाने अभिमानाने मराठीच बोलतो. उदहरणार्थ अगदी मुंबई ते छत्रपती संभाजी नगर या इंडीगोच्या विमान प्रवासात घोषणा फक्त हिंदी आणि इंग्रजीतूनच होतात. महाराष्ट्रात असूनही मराठीत घोषणा होत नाही. हे मी स्वानुभवावरून सांगतोय. त्या विमानात ही मराठीचा गंध नसणाऱ्या हवाई कर्मचाऱ्यांशी आम्ही हट्टाने मराठीतच बोलतो. रिक्षावाल्यांशी ही आम्ही मराठीतच बोलतो. महाराष्ट्रात मराठीच”. समीर यांनी अगदी मुद्द्याला धरुन आपलं मत मांडलं. तसेच मराठी भाषेविषयी असणारं प्रेम त्यांनी व्यक्त केलं.

Tags: entertainment newsmarathi actorsamir choughule
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
Next Post
International Yoga Day 2025

कॅन्सर, घटस्फोट, डिप्रेशनसारख्या कठीण काळात योगचा कलाकारांना मोठा आधार, उत्तम पर्याय निवडला कारण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.