शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
in Entertainment, Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Famous Actress and Actor Wedding News

सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात

Famous Actress and Actor Wedding News : मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये सध्या लग्नसराईचा माहोल सुरू असताना आणखी एका लोकप्रिय जोडीकडून चाहत्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘वचन दिले तू मला’ या मालिकेतील अभिनेत्री अनुष्का सरकटे आणि ‘कारभारी लयभारी’ या मालिकेतील अभिनेता निखिल चव्हाण यांचा नुकताच सुपारी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला आहे. याचसह अनुष्का आणि निखिलने त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली आहे. दोघांनी ‘कारभारी लयभारी’ या मालिकेत एकत्र काम करताना प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

मालिकेतील त्यांच्या केमिस्ट्रीला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आता हीच जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र येणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
या सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाचे खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये अनुष्का पारंपरिक लाल साडीत अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या लूकला लाल बांगड्या आणि डायमंड नेकलेसची जोड मिळाली आहे. दुसरीकडे निखिलने निळा शर्ट आणि काळी पँट असा साधा पण आकर्षक लुक कॅरी केला आहे. दोघेही आपल्या कुटुंबीयांसोबत हा खास क्षण साजरा करताना दिसत आहेत. ऑनस्क्रीन सुरू झालेलं हे नातं आता खऱ्या आयुष्यात नवीन टप्प्यात प्रवेश करत आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या बातमीकडे आता सर्वांचं लक्ष वेधून राहिलं आहे.

आणखी वाचा- सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

View this post on Instagram

A post shared by Viinod Shoba Naryan patil (@vinodpatil.official)

याशिवाय, अभिनेत्री अनुष्का सरकटे आणि अभिनेता निखिल चव्हाण यांनी त्यांच्या सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाचे एकही फोटो अद्याप अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेले नाहीत. त्यामुळे हे खास क्षण ते चाहत्यांसोबत नेमके कधी शेअर करणार?, याची उत्सुकता आता साऱ्यांनाच लागून राहिली आहे.

आणखी वाचा- कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

Tags: Famous Actress and Actor Wedding Newsmarathi actormarathi actressmarathi entertainment newsmarathi serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Deepali Sayed Home Coming

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, "उंबरठ्यावर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.