सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रार्थना बेहेरेच्या पायाला दुखापत, गुडघ्याची मोठी शस्त्रक्रिया, म्हणाली, “काही आठवडे तरी…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 21, 2025 | 11:58 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prarthana Behere Knee surgery

प्रार्थना बेहेरेच्या पायाला दुखापत, गुडघ्याची मोठी शस्त्रक्रिया, म्हणाली, “काही आठवडे तरी...”

मराठी मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. गेल्या काही काळामध्ये अगदी मोजक्याच चित्रपटांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटातही प्रार्थनाने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. त्यानंतर ती फार कुठे दिसली नाही. आता सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर करत प्रार्थनाने तिच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे. फोटो पाहिल्यानंतर चाहतेमंडळी, सहकलाकार काळजी घेण्याचा सल्ला तिला देत आहेत. शिवाय काही दिवसांसाठी प्रार्थना घरीच राहणार आहे. पण नक्की अभिनेत्रीला झालं काय?, विश्रांती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी का दिली? हे जाणून घेऊया. (Prarthana Behere Knee surgery)

प्रार्थनाने तिच्या घरातील काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये ती बेडवर झोपलेली दिसत आहे. तिच्या एका पायाला दुखापत झाली असल्याचं दिसत आहे. पुढील काही दिवस फक्त आराम करणार असल्याचं प्रार्थनाने पोस्टद्वारे सांगितलं. तिच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली आहे. दरम्यान एक पाय बांधून ठेवला आहे. त्यामुळे घरी आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.

आणखी वाचा – अहमदाबाद विमान अपघातात चित्रपट निर्माते महेश जिरावलाचा मृत्यू, DNA टेस्टद्वारे पटली ओळख, कुटुंबीय हादरले

View this post on Instagram

A post shared by Prarthana Behere Jawkar 💜 (@prarthana.behere)

प्रार्थना फोटो शेअर करत म्हणाली, “पुढील काही आठवडे माझ्यासमोर हेच चित्र असणार आहे. काही तक्रार नाही. गुडघ्याची सर्जरी झाली आहे”. तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच कमेंट्सच्या माध्यामातून प्रार्थनाला काळजी घेण्याचा सल्ला दिला. तसेच कलाकार मंडळींनीही प्रार्थनासाठी कमेंट करत लवकरात लवकर बरी हो असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा अडकला लग्नबंधनात, बालपणीच्या मैत्रिणीसह थाटला संसार, फोटो समोर

काळजी घे आणि लवकर बरी हो, तू लवकरात लवकर बरी होण्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत, तुला नक्की काय झालं?, स्वामींचा आशिर्वाद तुझ्या पाठिशी आहे अशा विविध कमेंट चाहत्यांनी तसेच कलाकारांनी केल्या आहेत. मध्यंतरी प्रार्थनाने मोठी घोषणा केली होती. पती अभिषेक व प्रार्थनाने मिळून एक मोठं शिवधनुष्य हाती घेतलं आहे. अभिषेक दिग्दर्शन करत असलेल्या पहिल्याच चित्रपटात प्रार्थना अभिनेत्री म्हणून काम करणार आहे. पण या चित्रपटाचं नाव व इतर माहिती याबाबत अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही. प्रार्थनाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

Tags: entertainment newsmarathi actressprarthana behere
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Pakistani Actress Ayesha Khan Dies

सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक मृत्यू, घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, शेजाऱ्यांना वास आला तेव्हा…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.