Bigg Boss 17 Updates : ‘बिग बॉस १७’मुळे अभिनेत्री अंकिता लोखंडे ही चांगलीच लोकप्रिय झाली. या घरात येण्यापूर्वीदेखील तिची लोकप्रियता होती. मात्र या घरात येताच क्षणी त्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, अंकितापेक्षा तिची सासू या माध्यमातून चांगलीच प्रसिद्ध झाली. अंकिताच्या सासूने याआधीही अनेकदा ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला होता. अशातच काल (२८ जानेवारी) रोज पार पडलेल्या महाअंतिम सोहळ्यातदेखील अंकिताच्या सासूने तिच्या थोरल्या सूनेबरोबर व विकीबरोबर उपस्थिती लावली होती.
महाअंतिम सोहळा पार पडत असताना या शोचा होस्ट व अभिनेता सलमान खान हा स्पर्धकांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत होता. यावेळी सलमानशी संवाद साधताना रंजना जैन यांनी “माझी सून जिंकली तर मला खूप जास्त आनंद होईल” असं म्हटलं. यावर अभिनेत्याने अंकिताच्या सासूबाईंना सल्ला देत असे म्हटले की, “गेल्या काही दिवसांत तुम्ही खूप प्रसिद्ध झाला आहात. त्यामुळे मला असं वाटतं की, पुढच्या सीझनमध्ये तुम्ही या शोमध्ये सहभागी झालं पाहिजे. या लोकांनी (विकी-अंकिता) तसं काहीच खास केलं नाही. पण, तुम्ही जर बिग बॉसच्या पुढच्या सीझनमध्ये आलात तर नक्कीच सीझन गाजवाल याची मला खात्री आहे.”
सलमानाचा हा सल्ला ऐकून उपस्थितांसह सर्वच प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. यादरम्यान, त्यांनी अंकिताने विकीबरोबर कधीही भांडणार नसल्याचे व पूर्ण परिवाराला सांभाळण्याचे व इतर काही वचनेदेखील दिली. तसेच अंकिताच्या सासूनेदेखील देव अंकिताला नेहमी आनंदी ठेवो व अंकिताने लवकरच आम्हाला मुल देवो” असंही म्हटलं.
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात अंकिता व विकीमध्ये अनेकदा टोकाचे वाद झाले होते. यानंतर पार पडलेल्या ‘फॅमिली वीक’ टास्कमध्ये अंकिताच्या सासूबाईंनी अभिनेत्रीच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. शिवाय रंजना जैन यांनी अंकिता-विकीच्या लग्नाला घरून संमती नव्हती असं विधानही केलं होतं. या वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांत त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या.