‘बिग बॉस १७’ चा महाअंतिम सोहळा अतिशय रंगतदार ठरला. अगदी धुमधडाक्यात या शोचा ग्रँड फिनाले संपन्न झाला. मुनव्वर फारुकी या पर्वाचा विजेता ठरला. मुनव्वरने फक्त ट्रॉफी जिंकली नाही तर ५० लाख रुपयांची बक्षीस रक्कम व एक नवीकोरी कार देखील जिंकली. महाअंतिम फेरीत अभिषेक कुमार, अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. काही लोकांना अभिषेक व अंकिता जिंकतील अशी अपेक्षा होती. (Ankita Lokhande Troll)
‘बिग बॉस १७’ च्या महाअंतिम सोहळ्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अंकिता लोखंडेच्या चाहत्यांना अभिनेत्री विजेती झाल्याचं पाहायचं होतं, मात्र तसं घडलं नाही. अंकिता टॉप ३ मधून बाहेर पडल्याने अभिनेत्रीबरोबरचं तिला पाठिंबा देणाऱ्यांचेही मन दुखलं. शोमधून बाहेर आल्यानंतर अभिनेत्रीचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
सोशल मीडियाच्या ट्रेंडनुसार, अंकिता टॉप २ मध्ये पोहोचेल असं मानलं जात होतं, परंतु त्याआधीच ती शोमधून बाहेर झाली. शोमधून बाहेर पडल्यानंतर तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये तिच्या चेहऱ्यावर नाराजीचा सूर उमटलेला पाहायला मिळत आहे. विजेत्याची घोषणा झाल्यानंतर अंकिता शोमधून बाहेर आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हसू दिसत नव्हते. त्याचवेळी तिला मीडिया व चाहत्यांच्या गर्दीने घेरले होते. अंकिता शोमधून बाहेर आल्यानंतर ती थेट तिच्या कारकडे गेली. अभिनेत्री तिच्या आईबरोबर होती आणि दोघीही जाताना मीडियाला टाळताना दिसल्या. अंकिताने यावेळी कोणाच्याही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत.
अंकिता लोखंडेचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. एकाने लिहिले, ‘तिला मन्नाराचा खूप हेवा वाटतो. मन्नारा एक गोंधळात टाकणारे व्यक्तिमत्व आहे, पण किमान ती खरी आहे. आशा आहे की अंकिताला जमिनीवर कसे राहायचे हे शिकायला मिळेल”. एकाने कमेंट केली की, ‘मन्नारा पहिली आली म्हणून ती नाराज आहे”, तर एकाने, “इगो हर्ट झाला मॅडमचा” अशी कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे.