Swanandi Tikekar new home photos : स्वतःच, हक्काचं घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि मुंबईत स्वतःच घर घेण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. कारण सध्या मुंबईत घराच्या किंमती कायच्या काय वाढल्या आहेत. त्यामुळे घर घेण्यासाठी सगळ्यांचीच तारांबळ उडाली आहे. अशातच अनेक कलाकार मंडळी आहेत जे घर घेतल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर करतात. बरीच मेहनत करून या कलाकारांनी त्यांचं स्वतःचं हक्काचं घर घेतल्याचं ते पोस्टद्वारे सांगतात. काही दिवसांपूर्वीच अंशुमन विचारे, अंकिता वालावलकर, गौरव मोरे या कलाकारांनी नवं घर घेतलं. यापाठोपाठ आता आणखी एका मराठी अभिनेत्रीच घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं. तीन वर्षांपासून पाहिलेलं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं असल्याची आनंदाची बातमी तिने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत दिली.
अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने नवं घर घेतलं असल्याची गुडन्यूज दिली आहे. स्वानंदीने २०२३ मध्ये गायक आशिष कुलकर्णीसह लग्नगाठ बांधली. लग्नानंतर दोघांनी मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहिलं. आणि लग्नाच्या तीन वर्षांनी त्यांनी हे स्वप्न पूर्ण केलं. अखेर स्वानंदी आणि आशिष यांनी त्यांचं स्वतःचं हक्काचं घर घेतलं.
नव्या घराच्या बाल्कनीत फोटोशूट करत त्यांनी ही आनंदाची बातमी दिली.
आणखी वाचा – ‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत
पोस्ट शेअर करत आशिष कुलकर्णी लिहितो, “गेली ३ वर्षं आम्ही नवीन घर खरेदी करायचंय यावर फक्त चर्चा करायचो पण, आज ते स्वप्न पूर्ण झालं आहे. असं एक स्वप्न ज्याबद्दल मी आणि माझी पत्नी स्वानंदी आम्ही दोघंही सतत गप्पा मारायचो. या घराचं स्वप्न आम्ही लाँग ड्राइव्हला गेल्यावर, चहा पिताना आणि भाड्याच्या एका घरातून दुसऱ्या घरात स्थलांतरित होताना कायम पाहिलं. आणि आज ते स्वप्न पूर्ण झालं. मुंबईमध्ये आता आमचं स्वतःचं हक्काचं घर आहे. हा हक्काच्या घराचा आनंदाचा क्षण आयुष्यात कधी येईल याची सुरुवातीला आम्हाला काहीच खात्री नव्हती, तसा विचारही केला नव्हता. फक्त हे स्वप्न एक दिवस नक्की पूर्ण होणार असा विश्वास होता. आज त्या स्वप्नाला एक नवीन पत्ता मिळाला. प्रिय मुंबई… तू आम्हाला तुझ्यात सामावून घेतलंस त्याबद्दल थैंक्यू”.
आणखी वाचा – “आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन
स्वानंदी आणि आशिषच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मुक्ता बर्वे, छाया कदम, यशोमन आपटे, अर्चना निपाणकर, सावनी रवींद्र या कलाकारांनी कमेंट करत अभिनंदन केलं आहे.




