शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पाचवीपर्यंतचे शिक्षण अन् आर्थिक अडचणी…; ‘डोंगरीचा मुन्ना’ ते ‘बिग बॉस १७चा’ विजेता, जाणून घ्या मुनव्वर फारुकीच्या एकूण प्रवासाबद्दल…

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 29, 2024 | 9:59 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Know the journey of bigg boss 17 winner Munawar Faruqui see the details

पाचवीपर्यंतचे शिक्षण अन् आर्थिक अडचणी…; 'डोंगरीचा मुन्ना' ते 'बिग बॉस १७चा' विजेता, जाणून घ्या मुनव्वर फारुकीच्या एकूण प्रवासाबद्दल…

गेले ३ महिने ज्या शोची सर्वत्र चर्चा सुरू होती असा छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो म्हणजे बिग बॉस. बिग बॉसचे यंदाचे १७वे पर्व हे अनेक कारणांनी गाजले. अशातच काल (२८ जानेवारी) रोजी या शोचा महाअंतिम सोहळा पार पडला आणि या बिग बॉसच्या यंदाच्या १७व्या पर्वाच्या विजेते पदाचा मानकरी डोंगरीचा लोकप्रिय कॉमेडियन व अभिनेता मुनव्वर फारुकी ठरला. घरात आल्यापासूनच त्याच्या वैयक्तिक आयुष्यात व शोमध्येदेखील अनेक चढ उतार आल्याचे पाहायला मिळाले. पण आपल्या चाहत्यांच्या व शुभचिंतकांच्या पाठिंब्यामुळे मुनव्वरने बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले असं म्हणायला हरकत नाही.

मुनव्वर या शोमध्ये येण्याआधी पासूनच लोकप्रिय होता. अभिनय व स्टँडअप कॉमेडीच्या माध्यमातून तो घराघरांत पोहोचला होता. त्याचबरोबर ‘लॉकअप’ या शोचादेखील तो विजेता होता. त्यामुळे मुनव्वरची लोकप्रियता ही अमाप होती. पण मुनव्वरचा इथपर्यंत येण्याचा प्रवास हा काही साधा सोपा नव्हता. अनेक खडतर व कठोर परिस्थितीवर मात करत त्याने इथपर्यंतचा पल्ला गाठला आहे. चला तर जाणून घेऊयात डोंगरीच्या मुनव्वरचा ‘बिग बॉस विजेता’ होण्यापर्यंतचा प्रवास…

मुनव्वरला लहानपणापासून कविता, शायरी व रॅप लिहिण्याचा आवड आहे. त्याचबरोबर तो स्टँड अप कॉमेडी करण्यातदेखील तितकाच माहीर आहे. बिग बॉसच्या घरात याचा प्रत्यय वेळोवेळी आलाच होता. त्यामुळेच ‘बिग बॉस’च्या घरात असताना मुनव्वरच्या समर्थनार्थ बॉलीवूडचे रॅपर गायक, किंग, बादशाह यांनी पुढाकार घेतला असल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय अनेक गायकांनी मुनव्वरला भरभरून मतं देण्यासाठी प्रेक्षकांना आवाहनही केलं होतं.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

मुनव्वरचे शालेय शिक्षण हे फक्त पाचवी इयत्तेपर्यंतच पूर्ण झालं. त्याला कौटुंबिक कारणांमुळे इयत्ता पाचवीनंतर शाळा सोडावी लागली होती. असा खुलासा मुनव्वरने ‘बिग बॉस’ शोमध्ये रिंकू धवन यांच्यासमोर केला होता. त्याचं प्राथमिक शिक्षण गुजरातमधील जुनागड येथे पूर्ण झालेलं आहे. मुनव्वरच्या शिक्षणात पाचवीनंतर खंड पडला. पण पुढे काही वर्षांनी त्याने उर्वरित शिक्षण पूर्ण केलं.

आणखी वाचा – Bigg Boss 17 Grand Finale  : मुनव्वर फारुकी ठरला ‘बिग बॉस १७’चा विजेता, वाढदिवशी तमाम भारतीयांकडून मिळालं मोठं बक्षीस, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

मुनव्वरचा जन्म २८ जानेवारी १९९२ रोजी गुजरातमधील जुनागडमध्ये झाला. कौटुंबिक समस्या व वडिलांचं आजारपण यामुळे त्याला बालपणापासून काम करावं लागलं होतं. आईच्या निधनानंतर तो मुंबईला आला. त्यानंतर २०२० मध्ये मुनव्वरच्या वडिलांचंही निधन झालं. याशिवाय मुनव्वरने ग्राफिक डिझायनिंगचाही कोर्स केला होता. पण वडिलांच्या आजारपणामुळे त्याला त्याचं शिक्षण सोडावं लागलं होतं. पुढे काही दिवसांनी ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केल्यानंतर मुनव्वरने एका नामांकित कंपनीत ग्राफिक डिझायनर म्हणून काम केलं आहे.

आणखी वाचा – आईचा आत्महत्येचा निर्णय अन् वडिलांवरील कर्ज ; ‘बिग बॉस १७’चा विजेता मुनव्वर फारुकीचा कौटुंबिक संघर्ष, जाणून घ्या…

मुनव्वर हा एक प्रसिद्ध कॉमेडियन व लोकप्रिय रॅपर म्हणून ओळखला जातो. त्याच्या अनेक कविता व स्टँडअप मधील विनोदी किस्से हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ‘बिग बॉस’च्या आधी मुनव्वरने ‘लॉकअप’च्या पहिल्या सीझनच्या विजेतेपद जिंकलं होतं.

दरम्यान, ‘दाऊद, यमराज औरत’ या म्युझिक व्हिडीओमुळे तो खऱ्या अर्थाने प्रसिद्ध व लोकप्रिय झाला. तसेच मुनव्वरने नुकतंच २० स्पर्धांवर मात करत ‘बिग बॉस १७’चा विजेता ठरला आहे. त्यामुळे त्याच्या अनेक चाहत्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Tags: bigg bossbigg boss 17 winnerBigg Boss 17 Winner Newsbigg boss newsBigg Boss Winner NewsBollywood Entertainement Newsbollywood newsentertainment newsMunawar Faruquiबिग बॉसबिग बॉस १७ विजेताबिग बॉस १७ विजेता बातमीबिग बॉस बातमीबिग बॉस विजेता बातमीबॉलिवूड बातमीमनोरंजन बातमीमुन्नवर फारुकी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
munawar faruqui mother

आईचा आत्महत्येचा निर्णय अन् वडिलांवरील कर्ज ; 'बिग बॉस १७'चा विजेता मुनव्वर फारुकीचा कौटुंबिक संघर्ष, जाणून घ्या…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.