सध्या सर्वत्र आयपीएलचं वारं वाहतंय. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात जास्त चर्चेत असलेली टीम म्हणजे मुंबई इंडियन्स. क्रिकेट विश्वातील सर्वात लोकप्रिय असणारा खेळाडू म्हणजे रोहित शर्मा. आयपीएलचा ‘किताब तब्बल ५ वेळा जाणून देणाऱ्या रोहितला यंदा मात्र कर्णधार पदावरून पायउतार व्हावं लागलं. रोहित शर्मा पायउतार झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचे कर्णधार पद हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आलं आणि प्रेक्षकांचा राग अनावर झाला. (Rohit Sharma Anant Ambani Viral Video)
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाला पहिल्या दोन सामन्यांमध्ये मोठ्या पराभवांना सामोरं जावं लागलं. त्या नंतर अनेकांनी हार्दिकच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं केलं. हैद्राबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबईला तब्बल २७७ रणांचा पाठलाग करावा लागला. या शर्यतीत रोहित शर्मा, ईशान किशन यांच्यासह अन्य खेळाडूंनी ही मोलाची साथ दिली. कर्णधार हार्दिक पांड्या मात्र फलंदाजीमध्ये खास कामगिरी करू शकला नाही. तसेच प्रथम गोलंदाजी करताना हार्दिकने घेतलेल्या काही निर्णयांवर देखील चाहत्यांनी आक्षेप घेतला. कालच्या सामन्यांनंतर चाहत्यांकडून हार्दिकवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे.
Akash Ambani having a chat with Rohit after the loss. ♥️ Yad Aa gay na Hitman ke ?#srhvsmi #SRHvsMi #Rohit #HardikPandya #MIvsSRH #IPL2024 #MumbaiIndians #Hitman #RohitSharma???? #baltimorebridge #TATAIPL2024 pic.twitter.com/j1TGsfY575
— Mukesh ???????? (@Hitmanclub504) March 28, 2024
हैद्राबाद विरुद्धच्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्स फ्रेंचाइजीचे सर्वेसर्वा अनंत अंबानी यांच्या सोबत रोहित शर्मा ने बराच वेळ चर्चा केल्याचा एक व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. तसेच रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर आणि नीता अंबानी यांचा ही चर्चा करतानाच एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये रोहित शर्मा काहीसा नाखुश देखील दिसत आहे. (Rohit Sharma Anant Ambani Viral Video)
या नाखुशीचं कारण नक्की काय आहे? रोहित शर्मा पुन्हा एकदा कर्णधारपदी विराजमान होणार का? मुंबई इंडियन्सची आगामी सामन्यासाठी नक्की काय तयारी असणार या बाबतचे अनेक प्रश्न या व्हिडीओ आणि फोटोवरून चाहत्यांच्या मनात उद्भवत आहेत. रोहित शर्माच्या चाहत्यांचा मात्र रोहितने पुन्हा कर्णधार व्हावे या गोष्टीकडे जास्त कल दिसत आहे तशा आशयाच्या अनेक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.